सचिन खेडेकर यांचा कोण होणार करोडपती हा कार्यक्रम तर सर्वांना माहितच आहे. लवकरच या कार्यक्रमाचा नवा पर्व सुरु होणार असून गेल्या महिन्यात या कार्यक्रमाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली होती. ‘मिस्डकॉल द्या आणि जिंका’ एक कोटी रुपये असा प्रोमो प्रदार्षित झाला होता. या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांना त्यांची उत्सुकता लागली आहे.
‘कोण होणार करोडपतीच्या नव्या प्रोमोमध्ये शाळेतील काही शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्न विचारताना दिसत आहेत. त्यामध्ये कोण कोण सहभाग होणार यावर निशा सोडून सर्व स्पर्धक कार्यक्रमात भाग घेण्यास तयार आहेत.
त्यावर सचिन खेडेकर म्हणतात की, “ही आहे निशा तिला मिळत नव्हती दिशा. निशाच्या घरी आले पाहुणे… त्यांच्यासमोर तिने गायले गोड गाणे… त्यानंतर तिच्या घरची मंडळी तिला म्हणतात,”निशा तू किती गोड गाणं गात आहेस. व्हायचं का तुला सिंगर? त्यानंतर निशा म्हणते,”जाऊ दे ना गं”.
View this post on Instagram
सचिन खेडेकर पुढे म्हणत आहेत, “सर्वांच्या डोक्यात होता हाच क्वेशन की कोटींचं प्रोजेक्ट क्लाइंट करेल का सॅन्शन.. निशाने दिलं बेस्ट सजेशन… बॉस म्हणाली, तुच का नाही देत प्रेझेंटेशन? त्यावर निशा म्हणतेय,”जाऊ द्या ना मॅम”. त्यानंतर पुन्हा सचिन खेडेकर म्हणत आहेत,”आव्हानांपासून निशा राहते कायम दूर, कारण तिचा नेहमी माघारीचा सूर”.
हे देखील वाचा : महाराष्ट्र शाहीर पाहून अवधूत गुप्तेही भारावले, शेअर केली खास पोस्ट
कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये असे दिसत आहे की, सचिन खेडेकर व निशा मंचावर एक खेळ खेळत आहेत. त्या दरम्यान सचिन खेडेकर म्हणत की,”आता आहे आव्हानांची खरी कसोटी.. कारण मिळणार आहेत दोन कोटी आणि तुमच्याकडे कोणतीही लाईफलाईन नाही, काय करायचं? यावर उत्तर देत निशा म्हणत आहे,”जाऊ दे ना सर… असं म्हणत सतत मागे राहिले आहे. पण आता होऊन जाऊ दे सर.. आता मागे नाही राहायचं”.
सोनी मराठीवर २९ मे पासून सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता कार्यक्रमाचा प्रोमो आउट करण्यात आला होता. त्यामुळे आत्ता येत्या २९ मे ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘मनासारखं जगायचं असेल तर आत्ता मागे नाही राहायचं, “कोण होणार करोडपती २९ मे पासून येणार प्रेक्षकांच्या भेटीला.”