बॉलिवूडची ड्रामा क्वीन आणि मराठी ‘बिग बॉस’मुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणजे राखी सावंत, एकीकडे तिने बॉयफ्रेंड आदिल खानबरोबर सुखी संसाराची स्वप्न बघत असताना मुंबईतील आंबोली पोलिसांनी तिला आज अटक केली आहे. राखी सावंत गेली अनेकवर्ष मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहे.
राखी वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते, मागील काही दिवसांपासून राखी तिच्या लग्नामुळे चर्चेत होती. काही दिवसांपूर्वी राखीने आदिल खान दुर्रानी याच्या सोबत त्याच्या रीतिरिवाजाप्रमाणे लग्न केले आहे. त्यावेळचे लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. लग्नानंतरचे अनेक फोटो व व्हिडीओ तिने शेअर केले आणि अगदी लग्नासाठी फातिमा हे नावही बदललं.
View this post on Instagram
आता मात्र राखी एका नवीन वादात अडकली आहे. मॉडेल आणि अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिने केलेल्या तक्रारीची दखल घेत अंबोली पोलिसांनी राखी सावंत हिला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. काही दिवसांपूर्वी राखी सावंतने शर्लिनचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल केले होते. पोस्ट व्हायरल करण्यासंदर्भात इलेक्ट्रॉनिक गॅझेट वापरले असल्याचा आरोप यात केला आहे, तर या प्रकरणात आणखी कोणाचा हात आहे, कोणी फोटो, व्हिडीओ पुरवले या संदर्भात पोलीस चौकशी करणार आहेत.
अंबोली पोलीस राखी सावंतला अंधेरी न्यायालयात हजर करणार आहेत. तक्रारीवरून राखी सावंतविरुद्ध आयपीसी आणि आयटी अॅक्टच्या कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. राखीने पत्रकार परिषदेदरम्यान मॉडेल चोप्राचा आक्षेपार्ह व्हिडीओ दाखवला आणि आक्षेपार्ह भाषा वापरली, असा आरोप केला आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना शर्लिननं म्हटलं आहे की, “मी नोव्हेंबरमध्ये राखीच्या विरोधात तक्रार दिली होती. तिला माझ्या प्रकरणात लक्ष घालण्याचे काहीही कारण नव्हते. माझी आणि साजिद खान, राज कुंद्राची भांडणं होती तर त्यामध्ये राखीचा बोलण्याच संबंध काय, ती मला वेश्या म्हणाली होती… त्यामुळे मला तिच्याबाबत कडक कारवाई करायचीच होती. म्हणून मी बदनामीची केस फाईल केली.”
शर्लिनने केलेल्या ट्विटनुसार मुंबई सत्र न्यायालयाने राखीचा अर्ज देखील फेटाळला आहे.