जगभरात १४ मे हा दिवस ‘ जागतिक मातृदिन‘ म्हणून साजरा केला जातो. अनेकजण मातृत्व दिनाच्या पोस्ट सोशल मीडियावर अगदी वेगवेगळ्या पद्धतीने शेअर करत आहेत. भारतात देखील मदर्स डे एकदम उत्साहात साजरा केला जात आहे. यामध्ये लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी सगळेच उत्साहाने सहभागी होत असतात.
सिनेसृष्टीतील कलाकार देखील मदर्स डे खूप उत्साहात साजरा करत आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वीच मातृत्वाचा आनंद मिळालेल्या आपल्या लाडक्या बॉलिवूड अभिनेत्री म्हणजेच आलिया भट्ट, बिपाशा बासू, गौहर खान. या अभिनेत्रींसाठी यंदाचा पहिलाच मदर्स डे असून त्यांनी तो एकदम उत्तमरित्या सेलिब्रेट केला आहे. या निमित्ताने त्यांनी सोशल मीडियावर काही खास पोस्ट देखील शेअर केल्या आहेत.
यावर्षी पहिल्यांदाच मदर्स डे सेलिब्रेट करत असलेल्या अभिनेतत्रींबद्दल आपण काही कोष्टी जाणून घेऊया.
१. गौहर खान-
बिग बॉस ७ मधून घराघरात पोहोचलेल्या गौहर खानने प्रेक्षकांमध्ये स्वतःची एक वेगळीच छाप पाडली आहे. ती नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. तिचं लग्न झैद दरबार सोबत झाले असून तिच्या घरी दोन दिवसांपूर्वीच तिने मुलाचे आगमन झाले आहे ही गुड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली.
२. बिपाशा बासू-
बिपाशा ही बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री असून तिने ३० एप्रिल २०१६ मध्ये करण सिंह ग्रोवर सोबत लग्न केले व सहा वर्षानंतर तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिच्या मुलीच नाव देवी बासू आहे. बिपाशा देखील यंदा पहिल्यांदाच मदर्स डे सेलिब्रेट करीत आहे.
View this post on Instagram
३. आलिया भट्ट-
अगदी कमी वयामध्ये प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे आलिया भट्ट हिने रणबीर कपूर सोबत लग्न केले व ते काही महिन्यांपूर्वीच आई-वडील झाले आहेत. आलियाने ६ नोव्हेंबर २०२२ ला एका गोड मुलीला जन्म दिला. त्यांच्या मुलीचे नाव राहा असे आहे.
४. काजल अग्रवाल-
सिंघम या चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री काजल अग्रवाल हिने गेल्यावर्षीच मुलाला जन्म दिला असून तिच्या मुलाचे नाव नील किचलू आहे. तिने सोशल मिडीयावर पोस्ट शेअर केली असून त्यावर चाहत्यांनी प्रचंड प्रेम व्यक्त केले आहे.
View this post on Instagram