डॉन 3 च्या स्क्रिप्टबद्दल केला खुलासा: काही वर्षांच्या ब्रेकनंतर बॉलिवूडचा बादशाह म्हणजेच ‘शाहरुख खान‘ने पुन्हा एकदा सिनेसृष्टीवर आणि प्रेक्षकांच्या मनावर ताबा मिळवला आहे. पठाणच्या धमाकेदार यशानंतर शाहरुख ‘जवान’ या आगामी सिनेमात झळकणार आहे. त्याचा हा सिनेमा ७ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
जवान सिनेमानंतर सलमान खानच्या ‘टायगर ३‘ या सिनेमात शाहरुख कॅमियो साकारणार असून हा सिनेमा २०२३ म्हणजेच या वर्षाच्या शेवटी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एवढेच नाही तर शाहरुखच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ब्लॉकबस्टर डॉन या सिनेमाच्या तिसऱ्या भागाबद्दल नवीन अपडेट्स समोर आले आहेत.
View this post on Instagram
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या डॉन सिनेमाच्या दुसऱ्या भागात जेव्हा शाहरुखला घेतले होते. तेव्हा संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अनेकदा त्यावरून ट्रोल ही केले गेले. परंतू सिनेमा जेव्हा प्रदर्शित झाला, तेव्हा मात्र सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. त्यामुळे या सिनेमाच्या तिसऱ्या भागासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत.
डॉन 3 या सिनेमाचे निर्माते रितेश सिधवानी यांनी सांगितले की,”जोपर्यंत त्यांचा पार्टनर फरहान अख्तर सिनेमाची स्क्रीप्ट लिहित नाही तोपर्यंत काहीच होणं शक्य नाही. सध्या फरहान सिनेमाच्या स्क्रीप्टवर काम करत आहे. आम्ही सगळेच ‘डॉन 3’ ला रिलीज करण्यासाठी उत्सुक आहोत”.
तसेच ते पुढे म्हणाले की, “माहितीसाठी सांगतो की सध्या फरहान अख्तर इतरही काही मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. तो ‘जी ले जरा’ सारखा सिनेमा करत आहे ज्यात प्रियंका चोप्रा,आलिया भट्ट,कतरिना कैफ एकत्र काम करताना दिसणार आहेत. तर शाहरुख खानविषयी बोलायचं झालं तर तो सध्या एटलीच्या ‘जवान’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमातील अभिनेत्याचा लूक नुकताच समोर आला होता. याव्यतिरिक्त राजकुमार हिरानीच्या ‘डंकी’ सिनेमातही शाहरुख खान काम करत आहे.”
यामुळे प्रेक्षकवर्गामध्ये सिनेमाची उत्सुकता आणखीच वाढली आहे.