अखिल भारतीय निवडणुकीचा निकाल रात्री उशिरापर्यंत मत मोजणी झाल्यावर पहाटे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा निकाल जाहीर झाला.
काल १६ एप्रिल रोजी एखाद्या राजकीय निवडणुकी इतक महत्त्व प्राप्त झालेली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक काल पार पडली.या निवडणुकीमध्ये ८ जागांवर प्रशांत दामले यांच्या रंगकर्मी नाटक समूहाच्या उमेदवारांनी विजय मिळवला. तर उरलेल्या दोन जागांवर प्रसाद कांबळींच्या आपल पॅनलचे प्रसाद कांबळी आणि सुकन्या कुलकर्णी-मोने यांचे दोन उमेदवार निवडून आले. मुंबई मध्यवर्ती शाखेत एकूण १३२८ इतके मतदान झाले. त्यापैकी माटुंगा यशवंत नाट्य मंदिर येथे १२४५ आणि गिरगांव येथे ८३ मतदान झाले. तर मुंबई उपनगर शाखा (मुलुंड – बोरिवली- वसई) यांचे एकूण ७३० मतदान झाले.
यंदाच्या निवडणुकीमध्ये राजकीय हस्तक्षेप असल्याच्या अनेक चर्चा रंगल्या होत्या. पण दामले विरुद्ध कांबळी यांच्या लढाईमध्ये आरोप प्रत्यारोप सहन करत या लढाईमध्ये अखेर दामले यांनी बाजी मारली व नाट्य परिषदेवर आपला झेंडा रोवला.
दामले यांच्या पॅनलमध्ये विजय केंकरे, विजय गोखले, सयाजी शिंदे, अजित भुरे, सविता मालपेकर, वैजयंती आपटे यांचा समूह ८/२ असा विजयी झाला आहे. तर दोन उमेदवार हे आपलं पॅनल मधून विजयी झाले असून यामध्ये स्वतः प्रसाद कांबळी आणि अभिनेत्री सुकन्या मोने विजयी झाल्या.
अ. भा. मराठी नाट्य परिषद पंचवार्षिक निवडणूक २०२३-२८
मध्यवर्ती शाखा – विजयी उमेदवारांना मिळालेल्या मतांची आकडेवारी
१) प्रशांत दामले (७५९)
२) विजय केंकरे (७०५)
३) विजय गोखले (६६४)
४) सयाजी शिंदे (६३४)
५) सुशांत शेलार (६२३)
६) अजित भुरे (६२१)
७) सविता मालपेकर (५९१)
८) वैजयंती आपटे (५९०)
९) सुकन्या कुलकर्णी-मोने (५६७)
१०) प्रसाद कांबळी (५६५)