भारताचा ऑल राउंडर आणि लोकप्रिय क्रिकेटपटू म्हणजे हार्दिक पांड्या. हार्दिक त्याच्या खेळीने आणि अनोख्या स्टाइलमुळे प्रचंड चर्चेत असतो. तसेच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील बराच चर्चेत असतो. तो सोशल मीडियावर नेहमीच खासगी आयुष्यातील नवनवीन गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतो.
हार्दिक पुन्हा एकदा लग्न करणार असल्याची बातमी सध्या सर्वत्रच पसरत आहे. हार्दिकने अभिनेत्री आणि मॉडेल नताशा स्टॅनकोविक सोबत ३१ मे २०२० रोजी लग्नबंधनात अडकला होता. परंतू आजच्या बातमीने चर्चांना उधाण आले आहे.
View this post on Instagram
हार्दिक पुन्हा एकदा त्याचीच पत्नी नताशासोबत लग्न करणार आहे. २०२० मध्ये त्यांनी खूपच घाईघाईत लग्न उरकले होते. त्याचे कारण म्हणजे लग्नाच्यावेळी नताशा प्रेग्नेंट होती. यामुळे त्या दोघांनी कोर्टात लग्न केले. लग्नाचे एकूण विधी आणि थाटामाटातील लग्नाची मौज त्यांची बाकीच होती.
यासाठी व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर ते पुन्हा एकदा एकमेकांसोबत लग्नगाठ बांधणार आहेत. त्यांचा हा दिमाखदार विवाहसोहळा उदयपूरमध्ये पार पडणार असून या शाही लगनसोहळ्याला अनेक दिग्गज मंडळी हजेरी लावणार आहेत. हार्दिक आणि नताशाच्या लग्न विधींची सुरुवात १३ फ्रेब्रुवारी पासून होणार असून १६ फ्रेब्रुवारी पर्यंत त्यांचे लग्न पार पडणार आहे.
या लग्नातील सर्वाधिक खास गोष्ट म्हणजे हार्दिक आणि नताशाच्या लग्नाला त्यांचा ३ वर्षांचा मुलगा अगस्त्य हा देखील उपस्थित असणार आहे. त्यांच्या लग्नाचे क्षण पाहण्यासाठी हार्दिक आणि नताशाचे सर्वच चाहते फारच उत्सुक झाले आहेत.