बॉलीवूडची चांदणी म्हणजेच सगळ्यांची आवडती श्रीदेवी. आज श्रीदेवीला जगाचा निरोप घेऊन ५ वर्ष झाली, तरीही आज ही ती सगळ्यांच्या लक्षात आहे आणि कायम राहील. ८० च्या दशकात दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपला नाव कमावल्यावर, श्रीदेवी यांनी बॉलीवूड मध्ये पदार्पण केले. उत्तम नृत्य आणि आपल्या अभिनयाने त्यांनी बॉलीवूड मध्येदेखील आपली वेगळी ओळख निर्माण केली. बॉलिवूडच्या या दिग्गज अभिनेत्रीचा शेवट मात्र कटू झाला. २१ फेब्रुवारी २०१८ रोजी त्यांचे दुबई येथे निधन झाले.
श्रीदेवी यांची मुलगी म्हणजेच बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर. जान्हवी नेहमीच तिच्या बोल्ड लुकमुळे चर्चेत असते. जान्हवीने ‘धडक’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. लोक तिला अभिनेत्री श्रीदेवी आणि दिग्दर्शक बोनी कपूर यांची मुलगी म्हणून ओळखत असले तरी तिने स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे.
आज श्रीदेवी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या लेक जान्हवी कपूरने पोस्ट शेअर केली आहे. जान्हवीने श्रीदेवी यांच्याबरोबरचा फोटो शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये तिने असं म्हंटल आहे, “मी आजही प्रत्येक ठिकाणी तुला बघते आई, मी आजवर जे करत आहे मला आशा आहे त्याने तुला अभिमानच वाटेल. मी आज कुठे ही गेले आणि काहीही केले त्याची सुरवात आणि शेवटहा तुझ्यापासून होतो.”
View this post on Instagram
श्रीदेवी यांनी अनेकवर्ष चित्रपटात काम केल्यानंतर १९९७ मधील ‘जुदाई’ या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर श्रीदेवी यांनी चित्रपटात काम करणं कमी केलं. नंतर जान्हवीचा जन्म झाला आणि थेट २०१२ साली श्रीदेवी यांनी ‘इंग्लिश वींग्लिश’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुन्हा पदार्पण केलं होतं.