बॉलिवूड मधील कंगना रणौत (Kangna Ranaut) हे नाव तर तुम्ही ऐकलच असेलं, अभिनेत्री कंगना रणौत ही नेहमीच चर्चेत असते. ती तिच्या खासगी आयुष्याबद्दल व चित्रपटांमुळे देखील सतत चर्चेचा विषय ठरते. सध्या कंगना व करण जोहर मध्ये वादविवाद असल्याचे दिसून येत आहे. या आधी कंगनानं करणला डिवचण्याचं कारण प्रियांका ठरली होती. मात्र आत्ता तिने त्याला चौधरी चाचा म्हणत सुनावलं आहे.
कंगनाने तिच्या सोशल मिडिया आकाउंट वरून काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून तिचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. बहुतेक तिला तिच्या स्वप्नांचा राजकुमार भेटला असावा असा अंदाज त्यांनी लावला आहे. त्या फोटोंना तिने ‘इश्क वो आतिश है गालिब जो लगने से लगती नहीं और बुझाने से बुझती नहीं’ असं कॅप्शन देखील दिलं आहे. तिने लवकर सेटल व्हावं अशी तिच्या चाहत्यांची इच्छा आहे.
इश्क़ वो आतिश है ग़ालिब लगाने से लगती नहीं और बुझाने से बुझती नहीं ♥️ pic.twitter.com/Ayds9o3RmA
— Kangana Ranaut (@KanganaTeam) April 9, 2023
तिच्या भूतकाळातील अफेअर्सच्या चर्चा अजूनही चालू असतात. ३२ वर्षीय कंगनाची ही पोस्ट पाहून काहीजण तिच्या फोटोला कमेंट करत आहेत, तर काही तिच्या लूकच कौतुक करत आहेत. एकाने लिहिलंय, ‘कोण आहे जो स्वप्नात आला आहे, तो कोण आहे जो हृदयात शिरला तर काहींनी तिला ऋतिक रोशनची आठवण येते का असं टोमणा देखील मारला आहे. कंगना रणौत (Kangna Ranaut) कोणाच्या तरी प्रेमात पडली असावी असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.
2021 मध्ये दिलेल्या मुलाखतीत कंगना रणौत म्हणाली होती, ‘ तिला लग्न करायचं आहे आणि मुलं हवं आहे. ती स्वत:ला पाच वर्षांनी आई आणि पत्नी म्हणून पाहते. तिला तिच्या जोडीदाराबद्दल विचारलं असता, “तुम्हाला लवकरच कळेल.” असं ती म्हणाली होती.
Also Read This : राम चरणने सांगितला सलमान सोबतचा अनुभव