हेमंत अवताडे दिग्दर्शित ‘घर बंदुक बिर्याणी’ हा मराठी चित्रपट ७ एप्रिल २०२३ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. वेगळ्या विषयाची हटके मांडणी असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरला आहे. या चित्रपटातील गाणी आणि टीझरपासूनच प्रेक्षकांना याची उत्सुकता लागून राहिली होती. सगळ्याच स्तरातून या चित्रपटाचं कौतुक होत आहे. तसेच आकाश आणि सायलीची नवीन जोडी देखील प्रेक्षकांना चांगलीच आवडली आहे.
नुकतच नागराज मंजुळे आणि सयाजी शिंदे यांनी एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात चित्रपटाबद्दल काही खुलासे केले. हा चित्रपट सुरुवातीला आकाश ठोसरसाठी करायचा असं नागराज यांच्या डोक्यात होतं. त्याविषयी बोलताना नागराज म्हणाले, “हा चित्रपट सुरुवातीला आकाशसाठी आला होता, त्यात याला रोल द्यायचा होता. हा चित्रपटच करायची माझी इच्छा नव्हती. मी जेव्हा ही गोष्ट ऐकली तेव्हाच ती मला अपूर्ण वाटली होती. संकल्पना फारच उत्तम होती, पण ती पूर्ण वाटत नव्हती. माझा धाकटा भाऊ आणि हेमंत यांनी मला ही कथा पुन्हा ऐकण्यासाठी विनंती केली. मग मी आणि हेमंत आम्ही दोघांनी मिळून याचं लिखाण सुरू केलं आणि मग इतर पात्रं आमच्या नजरेसमोर येऊ लागली.”
पुढे नागराज यांनी चित्रपटाच्या नावाबद्दल खुलासा केला. ‘घर बंदूक बिर्याणी’ या चित्रपटाच्या नावाबद्दल नागराज म्हणाला, ‘काल हा चित्रपट रिलीज झालाय. ही फिल्म नावासारखीच आहे. या चित्रपटाची कथा हेमंत आवताडेची आहे. हेमंत जेव्हा माझ्याकडे ही गोष्ट घेऊन आला, तेव्हा त्या गोष्टीमध्ये फक्त बिर्याणी होती. नंतर आम्ही दोघांनी ही गोष्ट लिहिण्यास सुरुवात केली.तेव्हा लक्षात आलं की या कथेला घर बंदूक बिर्याणी हेच असावं. लोकांना हे काही तरी नवं वाटत आहे. चित्रपटाचं नाव आणि चित्रपटाचा आशय या दोन्ही गोष्टी नव्या आहेत. त्यामुळे नव्या आशयाला नवं दिलं आहे.’ असं नागराज मंजुळे म्हणाले.
या चित्रपटाबद्दल सायाजी शिंदे म्हणाले, ‘मला वाटतं की, घर बंदूक बिर्याणी या चित्रपटाच्या माध्यामातून नागराज हा एक स्टेप पुढे गेला आहे. प्रत्येक कलावंताकडे एक जॉनर असतो. या चित्रपटामधून त्याला नवा जॉनर सापडला आहे. माझी ही फिल्म करायची इच्छा नव्हती , पण मी या कथेबाबत विचार करावा अशी माझ्या भावाची आणि हेमंताची इच्छा होती. त्यानंतर आम्ही कथा लिहायला घेतली. हा चित्रपट लिहिताना मला वाटलं की सया दादानं या चित्रपटात भूमिका साकारावी. अशा प्रकारचे चित्रपट आपण करायला पाहिजेत.’
सध्या बॉक्स ऑफिस वर हा सिनेमा धुमाकूळ घालतोय.