कतरिना कैफ आणि विकी कौशल गेल्या वर्षी लग्नबंधनात अडकले. कतरिना आणि विकी हे बॉलीवूडमधील एक लोकप्रिय कपल आहेत . या दोघांची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडते. या दोघांच्या लग्नानंतर लगेचच कतरिना आई होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होत. पण आता कतरिनाने प्रेग्नंसी बाबतीत मौन सोडल आहे.
काही दिवसांपूर्वी कतरिना बाबा सिद्धीकीच्या पार्टी मध्ये दिसली होती. त्यावेळी तीने अगदी सैल ड्रेस घातला होता आणि ओढणीने पोट लपवताना दिसली. यावरुन चर्चा परत सुरु झाल्या. प्रेग्नंसी प्लॅनिंग कधी करणार यावर कतरिना तिच्या मित्रपरिवारासमोर व्यक्त झाली आहे.ती म्हणाली,”पुढील काही चित्रपटांच्या शूटनंतर बाळाचं प्लॅनिंग करणार आहे.”
कतरिना, विजय सेतुपती आणि फरहान अख्तरसोबत सिनेमा करत आहे. मेरी ख्रिसमसमध्ये कॅटरिना कैफ विजय सेतुपतीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. त्याच शुटींग मात्र अद्याप पूर्ण झाल नाही. ‘जी ले जरा’ हा चित्रपटाचे शुटींग अजून सुरू झाले नसले तरी ते लवकरच होऊ शकते. या चित्रपटात आलिया भट्ट आणि प्रियांका चोप्रासोबत कतरिना कैफ दिसणार आहे.
हे देखील वाचा : १२ मे रोजी ‘सुशांत सिंह राजपूत’चा हा सिनेमा दिसणार रुपेरी पडद्यावर…
तसेच कतरिना लवकरच सलमान सोबत ‘टायगर ३’ मध्ये देखील दिसून येणार आहे. या मध्ये सलमान आणि कतरिना सोबत इमरान हाश्मी देखील महत्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहे.