आपल्या विनोदाने सर्वांना खळखळून हसवणारा अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके. कुशलचे फक्त महराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगभरात लाखो चाहते आहेत. ‘चला हवा येऊ द्या’ च्या माध्यमातून तो घराघरांत पोहोचला. नेहमीच सगळ्यांना हसवणारा कुशल मात्र कधी कधी भावूक होऊन जातो.बऱ्याचवेळेस तो सोशल मिडियावर व्यक्त होत असतो. अनेक वेळा त्याच्या पोस्ट अतिशय भावनिक असतात.
कुशल पत्नी सुनयना बद्रिके ही एक उत्तम कथ्थक डान्सर आहे. ती ‘मुघल ए आजम’ या महानाट्यात काम करत आहे. ती नाटकाच्या प्रयोगासाठी अमेरिकेला रवाना झाली आहे. तिला विमानतळावर सोडण्यासाठी कुशल आणि त्याची मुले गेली होती. याचा एक खास फोटो कुशलने त्याच्या सोशल मिडियावर पोस्ट केला आहे. आणि या फोटोला कुशलने एक छानसं कॅप्शन दिलं आहे.
त्याने लिहिले आहे की, “ यार सुनयना, तू काय बाबा आता “अमेरिकेला” जाणार, “मुघल ए आजम” मधे, डांस बिंस करणार, पिझ्झा बर्गर खाणार , झ्याक-प्याक राहणार..
View this post on Instagram
जायचं आहे तर जा, “आमाला काय…. बाबा” खरंतर एवढे दिवस तुझ्यावाचून राहायची सवय नाही ना “घराला” म्हणून जरा काळजाला “घरं” पडल्या सारखं झालंय बस. बाकी तू परत येशील तेंव्हां…..हा ऋतू बदलला असेल, पाऊस, “कुणीतरी पाणी शिंपडावा” एवढाच् उरला असेल, शाळेत मुलांचे वर्ग आणि मित्र बदललेले असतील, “मनुची” हाफ पँट जाऊन फुल पँट आली असेल, “गंधूची” परीक्षा जवळ आल्यामुळे अख्ख घर अंडरप्रेशर असेल. काय गंमत आहे बघ, कधी काळी, “आपलं सुद्धा एक घर असेल”, अशी स्वप्नं पापण्यांत घेऊन, आपण घराच्या वाटेकडे डोळे लाऊन बसायचो, आता “तुझ्या” वाटेकडे “आपलं घर” डोळे लाऊन बसेल….
आणि मी……मी, छोट्टीशी खोली होऊन जाईन त्या घरातली, नुसत्या भिंतींची…. तुझ्या वाचून रिकामी………. (सुकून)
तळ टिप:- तुला संधी देणाऱ्यांचे मनापासून आभार
आणि मुघलांनी अमेरिकेवर कधीच राज्य केलं नाही, पण “मुघल ए आजम” ह्या तुमच्या कार्यक्रमाने अख्खी अमेरिका जिंकावी, ह्या सगळ्यांना शुभेच्छा.”
दिग्दर्शक फिरोज अब्बास खान यांनी ‘मुघल-ए-आझम’ या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. हे एक संगीतमय नाटक आहे. तसेच अभिनेत्री आणि गायिका प्रियांका बर्वेने या नाटकात अनारकलीची भूमिका साकारली आहे.