बॉलिवूडच्या काही दिग्गज अभिनेत्यांपैकी एक म्हणजे अभिनेते अनुपम खेर. अनुपम खेर कायम चर्चेत असतात. कधी त्यांच्या सिनेमांमुळे तर कधी त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे. वयाची सत्तरी गाठत असले तरी आजही त्यांचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहेत.
शेवटी अनुपम खेर हे ‘द काश्मीर फाइल्स’ या सिनेमात दिसले. त्यांच्या या सिनेमाला देशभरातून चांगलीच पसंती मिळाली. या सिनेमाच्या दमदार यशानंतर ते आता त्यांच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. अनुपम यांचा ‘विजय ६९‘ हा आगामी सिनेमा. या सिनेमाचे शूटिंग सध्या जोरदार सुरू आहे. परंतू विजय ६९ च्या सेटवर नुकताच एक अपघात झाला आहे. हा अपघात अनुपम खेर यांच्या सोबतच झाला आहे.
View this post on Instagram
या अपघातादरम्यान अनुपम यांना गंभीर दुखापत झाली आहे. अनुपम खेर यांना हेअरलाइन फ्रॅक्चर झाले असल्याची बातमी स्वतः अनुपम खेर यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत दिली. त्यांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये ते स्वतः आहेत. चेहऱ्यावर सुंदर हसु असले तरी त्यांच्या उजव्या हाताला मात्र स्लिंग लावलेले दिसत आहे. तसेच त्यांच्या हातात व्यायामासाठीचा चेंडू देखील आहे.