साउथ इंडस्ट्रीमधील सर्वात फेमस अभिनेत्री म्हणून नयनताराला ओळखलं जातं. ती तमिळ, तेलगु या चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. चंद्रमुखी, गजनी, यारडीनी मोहिनी, बिल्ला हे तिचे यशस्वी चित्रपट आहेत. तिने मल्याळम चित्रपट मानस्सिनाक्करे मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. नयनताराने २००३ मध्ये चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यापूर्वी ती मॉडेलिंग करायची. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील यशस्वी अभिनेत्रींमध्ये नयनताराचं नाव आवर्जून घेतलं जातं.
लवकरचं नयनतारा शाहरुख खानसोबत ‘जवान’ चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटासंबंधित अभिनेत्रीच एक मोठं अपडेट समोर आलं आहे. शाहरुख खानच्या ‘जवान’ या सिनेमासाठी नयनतारा तिचा १६ वर्षांचा नियम मोडणार आहे. तिला साउथ इंडस्ट्रीमधील सर्वात महागडी व लेडी सुपरस्टार असं ही म्हंटलं जातं.
अभिनेत्याची या सिनेमामध्ये दुहेरी भूमिका असल्याचे सांगितले जाते. या सिनेमासाठी अभिनेत्रीने सर्वात मोठं पाऊल उच्चलं आहे. तिने या सिनेमात चक्क बिकनी परिधान करत असल्याचे सांगितले आहे. या आधितीने कुठलाही चित्रपट साइन करण्याआधी ‘नो बिकनी’ असं सांगितलं आहे. तिने हा निर्णय अतिशय विचारपूर्वक घेतला असून यासाठी अभिनेत्रीला मोठ्या प्रयत्नांनी तयार करण्यात आली आहे. दिग्दर्शक अटली या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.
नयनतारा तिच्या बॉलिवूड डेब्युसाठी प्रचंड चर्चेत असलेली अभिनेत्री आत्ता किंग खान शाहरुखसोबत हिंदीमध्ये पदार्पण करणार आहे.