दुनियादारी, क्लासमेट, वजनदार, धुरळा, प्यारवाली लव्हस्टोरी, सनई-चौघडे, नो एन्ट्री पुढे धोका आहे यांसारख्या अनेक सिनेमांमधून मराठी सिनेसृष्टी गाजवलेली अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर (Sai Tamhankar).
आपल्या दमदार अभिनयाने सईने प्रेक्षकांचे मन जिंकले तसेच तिच्या बिनधास्त शैलीने तिने तिचा प्रचंड मोठा चाहतावर्ग देखील निर्माण केला. सिनेमांमुळे कायम तिचं कौतुक झालंच शिवाय ती एकामागोमाग एक चढत असलेली यशाची पायरी अन् त्यामुळे उंचावणारी मराठी सिनेसृष्टीची मान यामुळे देखील तिचे कायमच कोडकौतुक होत आले आहे. तर आता सई नुकतीच ‘भक्षक’ या सिनेमात झळकली. या सिनेमात देखील तिने भूमी पेडणेकर ही महत्त्वाची भूमिका पार पाडताना दिसली. तर आता त्या पाठोपाठ सईच्या नशिबी आणखी मोठे दोन सिनेमे आले आहेत. पण हे सिनेमे मराठी नसून हिंदी सिनेमे आहेत.
एकूणच काय तर पुन्हा एकदा आगामी सिनेमातून सई बॉलिवूडवर अधिराज्य गाजवताना दिसणार आहे. त्यांनतर आता सई थेट इम्रान हाश्मी आणि प्रतिक गांधी यांच्यासोबत काम करणार आहे. २०२४ मधील एक्सेल एंटरटेनमेंट यांच्या २ आगामी प्रोजेक्ट्सचा सई भाग असणार आहे. इम्रान हाश्मी आणि प्रतिक गांधी यांच्या समवेत सई ‘ग्राउंड झिरो’ आणि ‘अग्नी’ यामध्ये झळकणार आहे. मराठीसह काही मोजक्या हिंदी सिनेमांमध्ये तिने आधीच नाव कमावले आहे.
तर आता एक नव्हे तर दोन सिनेमे आणि एक सिरीज असे तीन प्रोजेक्ट हाती आल्यावर तिने नवीन प्रोजेक्टबद्दल सांगितले. तेव्हा ती म्हणाली की, “ एक्सेल एंटरटेनमेंट सारख्या प्रोडक्शन हाऊससोबत काम करण्याची संधी मला मिळाली याचा खूप आनंद आहे. कायम वेगवेगळ्या प्रोजेक्टवर एक्सेल काम करते. त्यामुळेच त्यांच्या सोबतीने काम करण्याची वेगळी मज्जा आहे. आता मला त्यांच्यासोबत तिसऱ्यांदा काम करण्याची संधी मिळत आहे. ‘डब्बा कार्टेल’ सोबतीने ‘ग्राउंड झिरो’ आणि ‘अग्नी’ हे सगळेच प्रोजेक्ट्स माझ्या करिअरचा एक महत्त्वाचा भाग आहेत.”
अनेक वेगवेगळे बॉलिवूड प्रोजेक्ट केल्यावर सई इम्रान हाश्मी आणि प्रतिक गांधी यांच्यासह काम करण्यास प्रचंड उत्सुक आहे. इमरान हाश्मी आणि प्रतीक गांधी यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगताना सई ताम्हणकर म्हणाली की, “या दोघांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. या दोघांच्या सोबत काम करण्याचा अनुभव खूप काही शिकवणार आहे. दोघेही उत्तम अभिनेते आहेत. त्यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करणं म्हणजे माझं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. बॉलिवूडमधल्या अशा दोन मोठ्या कलाकारांसोबत काम करणं, याहून मोठं काय असणार आहे…”
तर आता घोषित झालेल्या सईच्या या सर्वच प्रोजेक्टसाठी तिच्या इतकेच तिचे चाहते देखील उत्सुक आहेत.