मागच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘पोन्नियीन सेल्वन:’ चा २८ एप्रिल रोजी दुसरा भाग जगभरात प्रदर्शित झाला. त्याचे दिग्दर्शन मणिरत्नम यांनी केले असून चित्रपट सिनेगृहात दाखल झाला आहे. ऐश्वर्या राय व त्रीशाच्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. पहिल्या भागाने ५०० कोटींहून अधिक कमाई केली होती. त्यामुळे दुसरा भाग हा त्याहून अधिक कमाई करेल अशी अपेक्षा आहे.
चित्रपटाच्या दुसऱ्या भागापेक्षा पहिल्या भागाची कमाई भारतात पहिल्या दिवशी ३४ कोटी रुपये आणि जगभरात ८० कोटी रुपयांची कमाई केली होती. इंडस्ट्री ट्रॅकर ‘सॅकनिल्क’च्या अंदाजांनुसार, पहिल्या दिवशी ‘PS-2’ने सर्व भाषांमध्ये देशभरात ३२ कोटी रुपये कमावले. ‘कोइमोई’च्या वृत्तानुसार, ‘PS-2’ ने प्रदर्शनापूर्वी ७.६ कोटी रुपयांची ॲडव्हान्स तिकिटं विकली होती. या चित्रपटाची सर्वात जास्त कमाई तमिळनाडूमध्ये होण्याची शक्यता आहे. चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची कमाई ही पहिल्या भागाच्या तुलनेत २ कोटी रुपये कमी आहे.
पहिल्या भागाची ॲडव्हान्स बुकिंग ही16 कोटी रुपये इतकी झाली होती. इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत, व्यापार विश्लेषक रमेश बाला यांच्या मते PS-2 ची तुलना केजीएफ: चॅप्टर २ किंवा बाहुबली २ यांच्याशी करणं योग्य नाही. कारण त्या दोन्ही चित्रपटांच्या दुसऱ्या भागांइतकी चाहत्यांना PS-2 साठी पुरेशी प्रतीक्षा करावी लागली नाही.
भारतामध्ये ‘पोन्नियीन सेल्वन:२’ हा चित्रपट हिंदी, कन्नड, तेलगु आणि मल्ल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित झाला असून त्यामध्ये जयम रवी, कार्ती, ऐश्वर्या राय, त्रिशा, ऐश्वर्या लक्ष्मी आणि शोभिता धुलीपला हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.