मागील काही वर्षांत अनेक मालिकांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यापैकी काही मालिका आणि त्यातील पात्रे आजही प्रेक्षकांच्या तोंड पाठ आहेत. त्यामुळे आजही प्रेक्षक जुन्या मालिका आवडीने पाहतात.
तसेच काही प्रेक्षकांची अशी अपेक्षा आहे की, त्यांच्या आवडत्या मालिकेचा पुढील भाग देखील प्रदर्शित व्हावा. अशीच एक मालिका म्हणजे ‘अजूनही बरसात आहे.’ या मालिकेने जरी निरोप घेतला असला तरी आजही प्रेक्षक या मालिकेची आठवण काढत असतात. या मालिकेमध्ये अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे हे दोघे प्रमुख भूमिकेत होते.
मालिकेत उमेशने आदिराज आणि मुक्ताने मीराची भूमिका साकारली आहे. हे दोघेही सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतात. तर आता सध्या उमेशची एक पोस्ट जबरदस्त चर्चेत आली आहे. त्याचे कारण म्हणजे त्याने शेअर केलेला फोटो आणि त्यावर लिहिलेले कॅप्शन. त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून नुकताच एक फोटो शेअर केला आहे.
View this post on Instagram
या फोटोमध्ये त्याच्या सोबत मिहिर राजदा आणि संकेत कार्लेकर देखील आहेत. त्यांच्या या फोटोला कॅप्शन देत लिहिले की, “तिघेही भेटलोय एका खास कामासाठी… जून मध्ये कळेलच…” त्यामुळे नक्की काय शिजतय हे जरी दामले नसले तरी प्रेक्षक मात्र त्यांचे अंदाज बांधत आहेत.
एकाने लिहिले की, “काहीही असो तिघे भेटलात म्हणजे नक्कीच काही तरी जबरदस्त आणि धम्माल असेल.” तर आणखी एकानं लिहिले आहे की, “प्रोजक्ट कोणताही असो पण अभिनेत्री मुक्ताचं पाहिजे.” तर काहींनी थेट प्रश्न केला आहे की, “अजूनही बरसात आहे पार्ट 2 सुरू होणार आहे का ?” यावरून चाहते या मालिकेच्या पुढील भागासाठी किती उत्सुक आहेत, हे आपसूकच समजून येते.
पण हे गुपित मात्र जून मध्येच उलगडणार म्हणटल्यावर प्रेक्षक नक्की काय आहे ते जाणून घेण्यासाठी खूपच उत्सुक आहेत.