झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित झालेला ‘बस बाई बस’ हा कार्यक्रम २९ ऑगस्ट पासून सूत्रसंचालक सुबोध भावे यांच्या सोबत मनोरंजनाच्या प्रवासाला निघाला आहे. आतापर्यंत सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे, अमृता फडणवीस आणि अमृता खानविलकर यांनी या
कार्यक्रमात उपस्थित राहून आनंद घेतला.
कायम काही ना काही कारणाने चर्चेत असणारी मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री पूजा सावंत नुकतच प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘दगडी चाळ २’ मुळे चर्चेत आली आहे. दगडी चाळ २ या सिनेमाच्या प्रमोशानानिमित्त पूजा बस बाई बस च्या येत्या एपिसोडसाठी पोहचली आहे. या कार्यक्रमाच्या एका टास्कदरम्यान पूजाने तिचा क्रश कोण आहे आणि त्याच्याशी लग्न करण्याची तिची इच्छा असल्याचे सांगितले आहे.
बस बाई बस या कार्यक्रमाच्या एका टास्कमध्ये एका व्यक्तीचा अथवा प्राण्याचा फोटो दाखवला जातो आणि ती व्यक्ती बसमधील आपली सहप्रवासी असल्याप्रमाणे त्याच्यासोबत गप्पा मारायच्या आहेत. यावेळी बॉलिवूड अभिनेताचा सिद्धार्थ मल्होत्रा फोटो दाखवल्याने आता हा पूजाचा सहप्रवासी असल्याप्रमाणे तीला संवाद साधायचा असतो.
View this post on Instagram
सहप्रवासी सिद्धार्थसोबत संवाद साधत असताना पूजा म्हणते की, “मला तु खूप आवडतोस आणि माझं लग्न जर तुझ्याशी झाले तर मला नक्कीच आवडेल.” हे ऐकताच सुबोधसह सर्वच प्रेक्षकांमध्ये एकच आवाज झाला.