बॉलीवूडची देसी गर्ल ही भारतासह परदेशात देखील तेवढीच लोकप्रिय आहे. प्रियांकाने आतापर्यंत अनेक बॉलीवूड सिनेमे केले आहेत, त्याच प्रमाणे तिने हॉलीवूडमध्ये देखील तिचे नाव कमावले आहे. सध्या ती तिच्या ‘सिटाडेल’ या वेब सिरीजमुळे प्रचंड चर्चेत आहे. या निमित्ताने प्रियांकाने तिच्या वैयक्तिक आयुष्यबाबत अनेक खुलासे केले आहेत.
आता प्रियांकाने तिच्या लग्नातील एक मजेशीर गोष्ट सांगितली आहे. प्रियांकाने अमेरिकन गायक निक जोनास याच्या सोबत २०१८ साली लग्न केले, प्रियांका निकपेक्षा तब्बल १० वर्षांनी मोठी आहे. व दोघांना एक मुलगी देखील आहे. प्रियांका आणि निकने २०१८ साली ख्रिश्चन आणि हिंदू अश्या दोन्ही पद्धतीने लग्न केले. प्रियांकाने हिंदू रीतीरिवाजानुसार जोधपुर मध्ये फक्त जवळच्या मंडळींमध्ये लग्न केले.
नुकतेच प्रियांकाने ‘ब्रिटीश वोग’ या वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये प्रियांकाला तिच्या लग्नाबाबत विचारले असता, ती म्हणाली, “ राजस्थानच्या उदयपूरमध्ये माझे आणि निकचे लग्न झाले. त्यावेळी निकचे संपूर्ण कुटुंब भारतात आले होते. त्याचे आई-वडील, दोन भाऊ, त्याचे मित्र आणि निकचा लहान भाऊ हे सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित होते. या भव्य सोहळ्यात मी आणि निकने हिंदू पद्धतीने सप्तपदी घेतली. तसेच त्यापूर्वी आम्ही दोघेही ख्रिश्चन पद्धतीने विवाहबद्ध झालो होतो.”
पुढे ती म्हणाली, “ आमच्या लग्नाचा मुहूर्त रात्री १० वाजता होता. त्यावेळी ते सगळेजण अमेरिकेवरुन आले होते. त्यावेळी भारत आणि अमेरिकेतील वेळेच्या फरकामुळे त्यांना जेट लॅग होता. मी तेव्हा निककडे पाहत होते आणि तो त्याच्या संपूर्ण कुटुंबाकडे पाहत होता. कारण ते सर्वजण सतत डुलक्या काढत होते. ते फारच मजेशीर होते.”