सध्या कायमच चर्चेतील अभिनेत्री म्हणजे स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अश्विनी महांगडे. अश्विनी कायम तिच्या नवनवीन गोष्टींमुळे चर्चेत असते. सध्या ती स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून अनघा म्हणून प्रेक्षकांच्या समोर आली आहे.
तसेच ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असून तिच्या चाहत्यांसोबत बऱ्याच गोष्टी शेअर करत असते. त्यामुळे तिचे नवनवीन फोटोज् आणि व्हिडिओ चांगलेच चर्चेत असतात. तिच्या अभिनयामुळे जेवढे तिचे चाहते आहेत, त्याचप्रमाणे ती करत असलेल्या सामाजिक कार्यामुळे देखील तिने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.
अश्विनीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून खूपच खास व्हिडिओ शेअर केला. अन् फोटोज्ने बनवलेल्या व्हिडिओने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टमधून तिने पहिल्यांदाच तिच्या जोडीदाराचं नाव स्पष्टपणे सांगितले. तर तिच्या जोडीदाराचे नाव ‘नीलेश जगदाळे’ असे असून तो शेतकरी घरातील मुलगा आहे. तो सध्या शेती सोबतच फार्मफ्रेश ऑरगॅनिक फ्रेश या कंपनीचा मालक देखील आहे. तसेच त्याने अश्विनीसोबत मिळून ‘फ्लाइंग एन्जल लेट्स फ्लाय’ ही कंपनीदेखील सुरू केली आहे. ‘रयतेचे स्वराज्य’ या अश्विनीच्या प्रतिष्ठानमध्ये तो नेहमीच कार्यरत असतो.
View this post on Instagram
या सुंदर व्हिडिओला कॅप्शन देत लिहिले की, “आधार देणाऱ्याचे मन निर्मळ असावे आणि ते अनेक संकटांमधून गेल्यावरच समजते…” अश्विनी आणि नीलेश हे दोघे मागील काही वर्षांपासूनच प्रेम बंधनात आहेत. आत्तापर्यंत तिने काहीवेळा त्याच्या सोबतचे फोटोज् शेअर केले आहेत. तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी ते दोघे अनेकदा एकत्र दिसले आहेत. पण आजवर कोणीही त्यांच्या नात्याची कबुली दिली नव्हती. पण आज मात्र अश्विनी ने त्यांच्या या नात्यावर शिक्कामोर्तब केला आहे.
ते दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. अश्विनीच्या या पोस्टवर कलाकार मंडळी आणि तिचे चाहते भरभरुन लाइक्स व कमेंट्स करत तिला शुभेच्छा देत आहेत.