बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी काही काळ सिनेसृष्टीपासून लांब होती. पण आज मात्र सर्वत्रच तिची चर्चा सुरु आहे. त्याचे कारण म्हणजे तिचा आगामी सिनेमा आणि त्यातील तिचा व्हायरल झालेला लूक.
राणी शेवटी ‘बंटी और बबली २’ या सिनेमामध्ये दिसली होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाई करण्यात अयशस्वी ठरला असला तरी राणीच्या कामाचं मात्र सर्वांनीच कौतुक केले. त्यांनंतर काही काळ तिने कोणताही सिनेमा केला नाही, त्यामुळे ती रुपेरी पडद्यावर पुन्हा कधी दिसणार याचीच सर्व प्रेक्षक वाट पाहत होते. परंतु आता प्रतीक्षा संपली आहे. कारण राणी मुखर्जीचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘मिसेस चॅटर्जी vs नॉर्वे’ हे राणीच्या आगामी सिनेमाचं नाव. या सिनेमामधील राणीचे दोन फोटोज व्हायरल झाले आहे. एकामध्ये सुंदर पिवळ्या रंगाची साडी नेसली असून तिच्या कडेवर लहान मुलगी आणि बाजूला एक मुलगा बसला आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये तिने गुलाबी रंगाची साडी नेसली असून तिच्या हातात टेडी बेअर असून ती खूपचं भाऊक दिसत आहे.
त्यामुळे तिच्या या फोटोमागील दडलेली गोष्ट काय असेल हे पाहण्यासाठी प्रेक्षक फारच उत्सुक आहेत.या सिनेमामध्ये राणी प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. तर राणीचा ‘मिसेस चॅटर्जी vs नॉर्वे’ हा सिनेमा येत्या १७ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.