२०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या पुष्पा : द राईज (Pushpa : The Rise) या सिनेमाने प्रेक्षकांवर जादू केली होती. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या सिनेमाने तब्बल ४०० करोडच्या आसपास कमाई केली होती. फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात पुष्पाची हवा झाली होती. यातील डायलॉग, गाणी प्रचंड गाजली होती. तसेच यामधील पुष्पाचा म्हणजेच अल्लू अर्जुनचा लुक देखील सगळ्यांना प्रचंड आवडला होता. एकाच वेळी तमिळ, तेलुगु, हिंदी, मल्ल्याळम आणि कन्नड भाषेत सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमाची स्टार कास्ट देखील तगडी होती. अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना, सुनील, प्रकाश राज, राव रमेश, जगापाथी बाबू यांसारखे तमिळ सिनेसृष्टीतील अनेक मोठ मोठे कलाकार या सिनेमात होते.
पुष्पानंतर प्रेक्षक पुष्पा २ ची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर चाहत्यांची प्रतिक्षा संपली. १५ ऑगस्ट २०२४ रोजी (Pushpa 2) पुष्पा २ द रूल’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या भागात देखील सगळ्यांचा आवडता पुष्पा म्हणजेच अल्लू अर्जुन आणि सगळ्यांची आवडती श्रीवल्ली म्हणजेच रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत. मागील वर्षी अल्लू अर्जुनच्या वाढदिवसादिवशी म्हणजेच ७ एप्रिल २०२३ रोजी या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला होता. यामध्ये पुष्पा जेलमधून पळून गेला आहे असं टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे. या टीझरला देखील प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली होती.
आजकाल एखाद्या सिनेमाचे शुटींग सुरु असताना तिथले फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होतात आणि त्यामुळे सिनेमातील कलाकारांचे लुक रिव्हील होतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका अभिनेत्रीचा सिनेमातील लुक व्हायरल होत आहे. ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणीही नसून रश्मिका मंदाना आहे. रश्मिका सध्या आंध्रप्रदेशमध्ये पुष्पा २ च्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. यावेळी आंध्रप्रदेशमधील यागंती या गावातील शिव मंदिरात शुटींग दरम्यानचा रश्मिकाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये रश्मिका लाल साडी, अंगावर भरजरी दागिने आणि केसात गजरा या लूकमध्ये दिसून आली. तिचा हा लूक सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच रश्मिकाने तिच्या सोशल मीडियावर शुटींग दरम्यानचा मंदिरातील एक फोटो शेअर केला आहे. हा लूक पाहून चाहते ‘पुष्पा २ : द रूल’ साठी प्रचंड उत्सुक आहेत.
Wooohoooooo
Here is Srivalli's 1st lookNow the excitement to watch this film has increased further.
Teri Jhalak Asharfi @iamRashmika 🔥❤️#RashmikaMandanna ❤️pic.twitter.com/EsZEfMcXkS
— Rashmika Delhi Fans (@Rashmikadelhifc) March 19, 2024