नव्वदच्या दशकात संपूर्ण देशभरातील प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने आणि अदाकारीने घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे रेखा जी.
अनेक अफलातून सिनेमे केले आहेत. त्यामुळे त्यांचा चाहतावर्ग देखील प्रचंड मोठा आहे. त्यांचा नवीन सिनेमा किंवा त्यांना अभिनय करताना पाहण्यासाठी त्यांचे चाहते प्रचंड उत्सुक असतात. मागील काही काळापासून त्या सिनेमांपासून लांब आहेत.
तसेच इतर कलाकारांप्रमाणे कार्यक्रमांमध्ये त्या फारच क्वचितदा हजेरी लावतात. त्यामुळे आता तर त्यांची फक्त एक झलक पाहायला मिळावी यासाठी त्यांचे चाहते आसुसले आहे. पण आता मात्र त्यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. रेखा यांना पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात काम करताना पाहता येणार आहे. तेही कोणत्या सिनेमामध्ये नाही तर टेलिव्हिजनवर.
आता स्टार प्लस या चॅनेलवरील सर्वाधिक लोकप्रिय मालिका ‘गुम हैं किसी के प्यार मैं‘ या मालिकेत दिसणार आहे. गुम हैं किसी के प्यार मैं ही मालिका अनेक आठवडे सर्वाधिक टीआरपीच्या यादीत कायम अव्वल स्थान पटकावत आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेत रेखा जी दिसणार यामुळे या मालिकेचे प्रेक्षकही प्रचंड खूश आहेत.
आणखी एक खास गोष्ट म्हणजे रेखा जी स्टार प्लसवर पहिल्यांदा येत नाहीयेत. तर त्या या आधीही दोनवेळा आल्या आहेत. त्यापैकी यापूर्वी एकदा त्या याच मालिकेतही आल्या होत्या. त्यामुळे रेखा यांचे आणि गुम हैं किसी के प्यार मैं या मालिकेचे खूपच खास कनेक्शन आहे हे नक्की.
ही मालिका खूपच रंजक वळणावर असताना रेखा जी येऊन नव्या कलाकारांची ओळख करून देत या मालिकेला कलाटणी मिळणार आहे. त्यामुळे हा आगामी एपिसोड पाहण्यासाठी प्रेक्षकवर्ग प्रचंड उत्सुक आहे.