ब्लॉकबस्टर ठरलेल्या पठाण सिनेमानंतर आता उत्सुकता आहे ती भाईजान म्हणजेच सलमान खान याच्या ‘टायगर ३‘ ची . या सिनेमाच्या निमित्ताने ‘सलमान-शाहरुख’ या जोडीला पुन्हा पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहे.
सलमान खान सध्या त्याच्या ‘टायगर 3’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. दररोज या चित्रपटाबाबत काही ना काही बातम्या समोर येत असतात. दरम्यान, आता बॉलिवूडचा ‘किंग’ अर्थात अभिनेता शाहरुख खान सलमानच्या आगामी ‘टायगर 3’ या चित्रपटात कॅमिओ करताना दिसणार आहे.
सलमान खान आणि शाहरुख खान या दोघांनाही बॉलिवूडचे किंग म्हटले जाते. या कथेत टायगरला तुरुंगातून पळून जावं लागतं आणि पठाण त्याच्या मित्राच्या मदतीसाठी तिथे धावून जातो असं दाखवण्यात येणार आहे. इतकंच नाही तर या सीनमध्ये लोकप्रिय भारतीय जिम्नॅस्टही दिसणार असल्याचं बोललं जात आहे. या जिम्नॅस्टची व्यक्तिरेखा खलनायकाची असून, तुरुंगात त्याच्याशी भांडण केल्यानंतर शाहरुख आणि सलमान एकत्र तुरुंगातून पळून जाताना दिसणार आहेत.
ज्यावेळी पठाण हा अडचणीत होता, त्यावेळी सलमान खान त्याच्या मदतीला आला. ‘पठाण’ या चित्रपटात सलमानच्या तोंडी एक डायलॉग आहे. यात सलमान म्हणतो, “मी एका मोठ्या मिशनवर जात आहे. तेव्हा टायगरला पठाणची गरज भासू शकते. तू जिवंत असशील ना?” तर यावर पठाण देखील त्याला त्याच्या मिशनमध्ये मदत करण्याचं वचन देतो. शाहरुख खान आणि सलमान खान यांना परत सोबत पाहण्यास चाहते इच्छुक आहेत. आगामी टायगर 3 या चित्रपटामध्ये सलमान खान आणि शाहरुख खान यांची जोडी परत एकदा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे सलमानसोबतच्या त्याच्या खास अॅक्शन सीन्ससाठी मुंबईतील यशराज स्टुडिओमध्ये खास सेटही तयार करण्यात येतोय.