बॉलिवूडचा किंग खान अर्थातच सर्वांचा लोकप्रिय अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या ‘डंकी’ या आगामी चित्रपटासाठी प्रचंड चर्चेत आहे.
शाहरुखने एकावर्षामध्ये तब्बल तीन सुपरहिट सिनेमे दिले. २०२३ या वर्षाची धमाकेदार सुरुवात ‘पठाण’ या सिनेमाने झाली. तसेच त्याच्या ‘जवान’ या सिनेमाने देखील बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकुळ घातला. यानंतर आता प्रेक्षकांना ‘डंकी’ या आगामी चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे.
‘डंकी’ हा या वर्षातील तिसरा मोठा चित्रपट असणार आहे. या चित्रपटाची चर्चा अनेक दिवसांपासून होत आहे. नुकतीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली. आता सोशल मीडियावर ‘डंकी’च्या टीझर रिलीजची तारीख चर्चेत आली आहे.
View this post on Instagram
हा सिनेमा राजकुमार हिरानी यांनी दिग्दर्शित केला असून सिनेमाचा टीझर २ नोव्हेंबरला म्हणजेच शाहरुख खानच्या वाढदिवशी डंकीची पहिली झलक पाहायला मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. या सिनेमात शाहरुख खान मुख्य भूमिकेत असून तापसी पन्नू, दिया मिर्झा, बोमन इराणी हे देखील सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
सिनेमाचा टीझर शाहरुख खान लाईव्ह पाहणार असल्याचं बोलल जात आहे. त्यामुळे आता शाहरुखचा यंदाचा वाढदिवस खास होणार यात शंका नाही. शाहरुख डंकी निमित्ताने पुन्हा एकदा या वर्षातला सलग तिसरा सुपरहिट सिनेमा द्यायला सज्ज झालाय. हा सिनेमा २१ डिसेंबरला भारतभर प्रदर्शित होणार आहे. सिनेमा पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
हा सिनेमा शाहरुख खानचा या वर्षातील तिसरा सिनेमा असून तो ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. तर शाहरुख हा सिनेमा सिनेसृष्टीत लोकप्रियतेचा डंका वाजवणार का? हे पाहणे उत्सुकतेचे आहे.