सध्या सर्वात जास्त चर्चेत असलेला शो म्हणजे बिग बॉस हिंदी. बिग बॉस हिंदीचा १६ वा सिझन सुरु आहे, प्रेक्षक देखील या सिझनला भरभरून प्रतिसाद आणि प्रेम देत आहेत. तर या सिझनमध्ये घरात एकापेक्षा एक अवलिया कलाकार आहेत.
त्यातील एक अवलिया कलाकार म्हणजे आपला मराठी माणूस शिव ठाकरे. सध्या शिवची घरातील इतर सदस्यांशी असलेली मैत्रीही प्रचंड गाजत आहे. शिवाय वादादरम्यान तो स्वतःवर करत असलेल नियंत्रणही कौतुकास्पद असल्याचं बोललं जातं. शिवने बिग बॉस मराठीचा दुसरा सिझन चांगलाच गाजवला होता. अन् त्या सिझनचा शिव विजेता ठरला होता.
शिव त्याच्या कामाबरोबरच खासगी आयुष्यामुळेही बराच चर्चेत असतो. बिग बॉसच्या घरातील शिव ठाकरे आणि वीणा जगताप यांची जोडी चांगलीच चर्चेत होती, शिवने बिग बॉसच्या घरातच हातावर वीणाच्या नावाचा टॅटू देखील काढला होता.
पण घरातून बाहेर पडताच शिव आणि आणि वीणा याचं ब्रेकअप झाल्याची चर्चा समोर आली. आजही ते दोघे या विषयावर बोलणं टाळतात. पण अजूनही शिवच्या हातावर वीणाच्या नावाचा टॅटू आहेच.
याबाबत त्याच्या आईने आता भाष्य केलं आहे. ‘पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये शिवच्या आईने त्याच्या व वीणाच्या नात्यावर भाष्य केलं. शिवच्या हातावर असलेल्या टॅटूबाबत विचारताच शिवची आई म्हणाली, “हा पूर्णपणे त्याचा विषय आहे. मला याबाबत काही बोलायचं नाही. तो आतापर्यंत मोकळेपणाने राहिला आहे. त्याला त्याचं स्वतंत्र आहे. तसेच तो त्याचे निर्णय स्वतः घेत आहे.”
तर शिवच्या आईने या दोघांच्या नात्याबाबत सखोल बोलणं टाळलं. तसेच त्याच्या आईने बिग बॉसच्या घरातील शिवच्या खेळाचं भरभरून कौतुकही केलं आहे.