सिनेसृष्टी कोणतीही असू प्रत्येक जागी आपल्या कर्तृत्वावर नाव गाजवणारा अभिनेता म्हणजे शिव ठाकरे. शिवने आतापर्यंत केलेल्या प्रत्येक कामगिरीमुळे मराठी सिनेसृष्टीची आणि मराठी माणसाची मान उंचावली आहे.
त्यानंतर २०१९ मध्ये बिग बॉस मराठी या रिॲलिटी शोमधून तो घराघरात पोहोचला. तसेच तो या शोचा विजेता ठरल्यामुळे तो प्रचंड प्रसिध्दीच्या झोतात आला होता. त्यानंतर नुकताच तो हिंदी बिग बॉस मध्येही होता. यात सुद्धा त्याने दुसरा क्रमांक पटकावला. त्यामुळे त्याच्या चर्चा संपता संपेना.
तर आता शिव लवकरच रोहित शेट्टीच्या ‘खतरों के खिलाड़ी’ मध्ये स्पर्धक म्हणून दिसणार आहे. हा शो अनेक अवघड कार्यांनी भरलेला असून शो पाहताना अंगावर काटा उभा राहतो. आत्ताच दिलेल्या एका मुलाखतीत शिवने या शोमध्ये जाण्यासाठी तो करत असलेल्या तयारीबद्दल सांगितले आहे. तेव्हा शिवने सांगितले की, “खतरों के खिलाडी साठी माझी तयारी अगदी छान सुरु आहे. यासाठी मी खूप मेहनत घेत आहे. मी कायमच माझ्या क्षमतेपेक्षा जास्तच गोष्टी करत असतो.”
तसेच शिव पुढे म्हणाला की, “मला आगीची भीती वाटत नाही. पाण्याची थोडीफार भीती वाटते. पण आता मी स्विमिंग शिकत आहे. त्याबरोबर इतर काही गोष्टींचा सरावही करत आहे.” त्यामुळे त्याला या शोमध्ये पाहण्यासाठी त्याचे चाहते प्रचंड उत्सुक आहेत.
तर शिव ठाकरे या शोसाठी सर्वाधिक मानधन घेणारा स्पर्धक ठरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिव या शोच्या प्रत्येक एपिसोडसाठी ५ ते ८ लाख रुपये घेणार आहे. त्याची प्रसिद्धी आणि लोकप्रियता पाहता त्याच्या मानधनाच्या किंमतीत दिवसेंदिवस प्रचंड प्रमाणात वाढ होताना दिसत आहे.