नवीन चित्रपटामुळे. आयुष्मान खुराना सध्या चर्चेत आहे. आयुष्मान आणि नुसरत भरुचा यांचा ड्रीम गर्ल हा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता. या मधील ड्रीम गर्ल सगळ्यांना फारच आवडली होती. आयुष्मान खुराणाने ड्रीम गर्ल ची भूमिका साकारली होती.
काही दिवसांपूर्वी आयुष्मानने एक व्हिडिओ पोस्ट करत ‘ड्रीम गर्ल २’ची घोषणा केली. तो नेहमीच या चित्रपटा बद्दल अपडेट देत असतो. प्रेक्षक देखील या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण आयुष्मानने एक नवीन अपडेट दिली आहे, ती म्हणजे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.
‘ड्रीम गर्ल २’ चित्रपटाचे टीझर्स सध्या प्रदर्शित होत आहेत. एका टीझरमध्ये पूजा रणबीर कपूरशी, दुसऱ्या टीझरमध्ये शाहरुख खानशी आणि तिसऱ्या टीझरमध्ये सलमान खानशी बोलताना दिसली. हा चित्रपट ७ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता. मात्र आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली गेली आहे.
हे देखील वाचा : जिओ स्टुडिओज् कडून सिनेमे आणि वेब सिरीजना मिळाले हक्काचे व्यासपीठ…
आयुष्मान खुरानाने आज सोशल मीडियावर एक पोस्ट करत या चित्रपटाची बदललेली तारीख चाहत्यांची शेअर केली. त्यात त्याने लिहिले आहे की, “चार वर्षांनी पूजा तुमच्या भेटीला येणार असल्याने त्याची तयारी सुद्धा तितकीच धमाकेदार व्हायला हवी. त्यामुळे आता पूजा २५ ऑगस्टला तुमच्या भेटीला येईल.”
त्यामुळे प्रेक्षकांना आजून थोडे दिवस या चित्रपटाची वाट पाहायला लागणार आहे.