ट्विटरवरील २० एप्रिल पासून फ्री ब्लू टिक बंद करणार असल्याचे ट्वीटरचे मालक इलाॅन मस्क यांनी सांगितले. तुम्हाला ब्लू टिक हवी असल्यास पैसे भरावे लागतील असे देखील सांगण्यात आले. २० एप्रिल पासून ज्यांना फ्री ब्लू टिक मिळाली आहे ती काढण्यात आली. यामध्ये अनेक कलाकार आणि राजकीय नेते यांचा समावेश होतो.
या प्रकरणावर दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी केलेल्या मजेशीर ट्विटने मात्र सोशल मिडियावर खळबळ उडाली आहे. त्यांनी असा आरोप केला आहे की, ज्यांचे फॉलोअर्स १ मिलियन आहेत. त्यांना फ्री मध्ये ब्लू टिक मिळाली आहे. पण अमिताभ बच्चन यांचे ४८.४ मिलियन फॉलोअर्स असून सुद्धा त्यांच्या कडून ब्लू टिक साठी पैसे घेण्यात आले आहेत. त्यांना पैसे देऊन ब्लू टिक दिल्याचा गंभीर आरोप त्यांनी ट्विटद्वारे केला आहे.
ब्लू टिक साठी युजर्सना दरमहिना ६५० रुपये तर वर्षाच सब्स्क्रिप्शन करायच झाल्यास त्यांना ६८०० रुपये भरावे लागणार. तसेच Android आणि iOS वापरकर्त्यांसाठी ९०० रुपये प्रति महिना योजना आहे. तर वर्षासाठी Android आणि iOS वापरकर्त्यांसाठी ९,४०० रुपये भरावे लागणार आहेत.
ब्लू टिक परत हवी असल्यास त्यांनी पैसे भरून ब्लू टिक परत घ्यावी असे ट्विटकडून सांगण्यात आले. ज्यांनी पैसे भरले त्यांना ब्लू टिक पुन्हा मिळाली देखील पण ज्यांचे १ मिलियन फॉलोअर्स आहेत आणि त्यांनी पैसे भरले नाहीत त्यांच्या नावसमोरची ब्लू टिक मात्र तशीच राहिली आणि ते त्या ब्लू टिकचे फुकट लाभ घेत असल्याच अमिताभ बच्चन यांनी इलाॅन यांच्या लक्षात आणून दिले आहे.
त्यांच्या या ट्विटवर काही युजर्सनी कमेंट देखील केली आहे की, तुम्हाला इलाॅन मस्क यांनी फसवले असून तुमचे पैसे आता परत मिळणार नाहीत.