सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे ती फक्त नी फक्त अभिनेत्री ‘सुष्मिता सेन’ची. सुष्मिता सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. मग चर्चा तिच्या कामाबद्दलची असो वा तिच्या खाजगी आयुष्याबद्दल.
सुष्मिता कायमच तिच्या आयुष्यातील प्रत्येक आनंदाची गोष्ट तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. तर सध्या तिच्या कारची चर्चा रंगली आहे. सुष्मिताने शनिवारी एक आलिशान कार खरेदी केली आहे. कारचे फोटोज् आणि व्हिडिओज् शेअर करताच नेटकऱ्यांनी तिच्या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
माजी मिस युनिव्हर्स आणि अभिनेत्री सुष्मिता ही तिच्या विलासी जीवन शैलीसाठी ओळखली जाते. त्यामुळे तिच्या चाहत्यांना देखील माहीत आहे की, सुष्मिता महागड्या वाहनांची शौकीन आहे. तर आता तिच्या कार कलेक्शनमध्ये आणखी एका गाडीची भर पडली आहे आणि तीही मर्सिडीज AMG GLE 53 Coupe या कारची.
तिने सांगितल्या नुसार ही कार तिने स्वतः ला गिफ्ट दिली आहे. यामुळे ती प्रचंड आनंदात दिसत होती. तर तिच्या या महागड्या कारची किंमत दोन कोटींहून अधिक असल्याची माहिती समोर आली आहे.
सुष्मिताने कारचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली की, “आणि ज्या स्त्रीला गाडी चालवायला आवडते… ती स्वतःला हे शक्तिशाली सौंदर्य भेटवस्तू म्हणून देते”
त्यामुळे सध्या सर्वत्र तिच्याच कारची चर्चा रंगलेली पहायला मिळत आहे.