वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ‘द केरला स्टोरी’ची पहिल्या दिवसाची कमाई पाहून व्हाल थक्क
सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे ती म्हणजे ‘द केरला स्टोरी’ (the kerala story) या सिनेमाची. चित्रपटाचा ट्रेलर जेव्हा पासून प्रदर्शित झाला आहे, तेव्हापासून बराच वाद सुरु झाला आहे. हा चित्रपट काल म्हणजेच ५ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.
लव जिहादच्या नावाखाली महिलांचे होणारे शोषण आणि सद्यस्थिती सारख्या विषयाला चित्रपटातून वाचा फोडण्यात आली आहे.
एका अत्यंत वेगळ्या विषयावर मांडणी करत शाह यांनी हा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणला आहे. या चित्रपटातील ३२ हजार महिलांच्या धर्मांतराचे दावे खोटे आहेत, असं म्हणत अनेक राजकीय पक्ष व धार्मिक संघटनांनी चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणीही केली होती.
वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story)
एक गट या चित्रपटाच्या समर्थनार्थ ठाम उभा राहिला, तर दुसरा गट या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी करत होता. पण अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाला असून पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई ‘द केरला’ स्टोरी’ (the kerala story) नं केली आहे.
पहिल्या दिवसापासून वादात सापडल्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करणार का? याची जरा शंका वाटत होती. पण पहिल्याच दिवशी ‘द केरला स्टोरी’ (the kerala story) ने ७.५ कोटी कमावले आहेत. विशेष म्हणजे वीकएंड मध्ये हा चित्रपट अजून जोरदार कमाई करेल असा अंदाज अनेकांनी वर्तवला आहे. त्यामुळे आता या चित्रपटाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.