‘शहजादा’ या सिनेमाच्या निमित्ताने चर्चेत आलेला अभिनेता म्हणजे कार्तिक आर्यन. कार्तिकचा हा सिनेमा जरी पुढे ढकलण्यात आला असला तरी तो सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहे. दुसरीकडे कार्तिक आणि सारा अली खानच्या रिलेशनशिपवरुन कायम चर्चा सुरू असते.
कार्तिकने नुकतीच इंस्टाग्रामवरुन एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्याने त्याच्या आईसोबतचा फोटो शेअर केला आहे. काही वर्षांपूर्वी समोर आलेल्या माहितीनुसार कार्तिक आर्यनच्या आईला ब्रेस्ट कॅन्सर झाला होता.
View this post on Instagram
कार्तिकची आई माला तिवारी या कॅन्सर सारख्या गंभीर आजाराला सामोऱ्या गेल्या. परंतू आता त्यांची ही लढाई संपली आहे. कारण त्यांनी आता कॅन्सरवर मात केली आहे. ही बातमी स्वतः कार्तिकने दिली. त्यामुळे सध्या कार्तिक खूपच खुश आहे आणि त्याने केलेली भाऊक पोस्ट पाहून अनेकांचे डोळे पाणावले तर अनेकांची इच्छाशक्ती प्रबळ झाली.
कार्तिकने त्याचा आईसोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, “या महिन्यात बिग सी अर्थात ‘कॅन्सर’चा आमच्या घरात शिरकाव झाला आणि त्याने आमच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. आम्ही हताश, निराश आणि असहाय्य होतो. पण या लढवय्यीचे आभार, जिच्या इच्छाशक्ती आणि कधीही हार न मानण्याच्या वृत्तीने या सगळ्यावर विजय मिळवला. आम्ही मोठ्या हिंमतीने आणि पूर्ण ताकदीने लढलो आणि जिंकलो. मात्र, यावरून एक गोष्ट समजली की, आपल्या कुटुंबाच्या प्रेम आणि पाठिंब्यापेक्षा मोठी शक्ती नाही.”
त्याने त्याच्या आईच्या इच्छा शक्तीचे आणि त्यांच्या धाडसाचे कौतुक केले आहे. तसेच अनेकांनी त्याच्या पोस्टवर कमेंट करत त्याच्या आईला निरोगी आयुष्य लाभावे ही सदिच्छा व्यक्त केली.