प्रेक्षकांना अगदी पोट धरून हसायला लावणारा शो म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’ या शो मधील प्रत्येक कलाकार त्यांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. यातील प्रत्येक कलाकाराला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. या शोमुळे अनेक कलाकार देशातच नाही तर जगभरामध्ये प्रसिद्ध झाले आहेत.
या शो मधील कलाकारांनी प्रेक्षकांना अगदी सुरुवातीपासून खळखळून हसवले आहे. त्यामुळे यांच्यापैकी एक जरी कलाकार कार्यक्रमात दिसला नाही, तर प्रेक्षकांच्या नजरेतून ही गोष्ट सुटत नाही. स्त्री भूमिका असो किंवा आणखी काही प्रत्येक कलाकार ते एकदम उत्तम पद्धतीने प्रेक्षकांन समोर सादर करतो.
पण आता मात्र या शो मधून एक कलाकार शो सोडून जाणार असल्याच म्हटल जात आहे. तो अभिनेता म्हणजे अंकुश वाढवे आहे. त्याच शो सोडण्यामागच कारण देखील तसच आहे. तो लवकरच ‘व्यक्ती प्रवृत्ती’ या नाटकामध्ये दिसणार असून तो या नाटकाच्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे. त्याने स्वतः याबद्दल खुलासा केला आहे. त्याला त्याच्या उत्तम अभिनयामुळे एका नवीन क्षेत्रामध्ये पदार्पण करण्याची संधी मिळत आहे. या नाटकाचे लेखन अंकुश वाढवे व विजय राख यांनी केले असून या नाटकाचे दिग्दर्शन अंकुश वाढवे करत आहेत.
‘चला हवा येऊ द्या’ मधील त्याचा सहकलाकार कुशल बद्रिके याने त्याला शुभेच्छा देत सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने एक पोस्टर शेअर केल आहे. त्यामध्ये अंकुश वाढवे सोबत अनेक कलाकार दिसून येत आहेत.
View this post on Instagram
त्यामुळे अंकुश ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये दिसणार की नाही असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे.