धमाकेदार कमबॅकनंतर बॉलिवूडच्या किंगची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली. ‘पठाण’च्या यशानंतर आता जवान या सिनेमात शाहरुख खान झळकणार आहे. पण सध्या जेवढी चर्चा किंग खानची असते तेवढीच त्याच्या फॅमिलीचीही दिसते.
नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे त्याची पत्नी गौरी, मुलगी सुहाना आणि मुलगा आर्यन कायम चर्चेत आले आहेत. कधी चाहत्यांकडून त्यांचे कौतुक होत असते तर कधी नेटकरी त्यांना ट्रोल देखील करतात. शाहरुखचा आगामी सिनेमा पुढे ढकलण्यात आला असला तरी तो सध्या #जवान वापरून अनेक पोस्ट करत असतो.
आपल्या चाहत्यांसोबात कायम कनेक्टेड राहावे म्हणून शाहरुख अनेकदा #AskSRK या खास सेशन दरम्यान ट्विटरवरील त्याच्या चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना दिसतो. बहुतांशवेळा तो इतकी गमतीशीर उत्तरे देतो की सर्वत्र त्याचीच चर्चा सुरू होते. #AskSRK दरम्यान शनिवारी असाच काहीसा प्रकार घडला. यावेळी एका ट्विटर युजरने त्याच्या मुलाबद्दल म्हणजेच आर्यन खानच्या नवीन ब्रँडच्या कपड्यांबद्दल प्रश्न विचारला.
आर्यन खानने काही दिवसांपूर्वीच त्याचा स्वतःचा कपड्यांचा नवीन ब्रँड सुरू केला आहे. Dyavol X हा नवीन ब्रँड लाँन्च केला आहे. पण जेव्हा हा ब्रँड सुरू झाला तेव्हापासूनच आर्यनला ट्रोल करण्यात आले त्याचे कारण म्हणजे त्याच्या ब्रँडच्या कपड्यांच्या किंमती. आर्यनच्या Dyavol X ब्रँडचे जॅकेट २ लाख रुपयांचे आहे आणि टी-शर्टची सुरुवातीची किंमतच सुमारे २४ हजारांपासून सुरू होते. त्यामुळे त्याचा हा ब्रँड सर्वसामान्य जनतेला परवडणारा नाही.
तर आर्यानच्या ब्रँडची गगनाला भिडलेल्या किंमतीशी संबंधित एक प्रश्न #AskSRK दरम्यान किंग खान विचारला की, “D’Yavol X चे १०००-२००० वाले जॅकेट बनवा, सध्या असलेल्या किंमतीचे कपडे विकत घेण्यात आमचं घर जाईल.” यावर शाहरुख खान म्हणाला की, “D’Yavol X चे हे लोक मला देखील स्वस्तात विकत नाहीत, मी काहीतरी करतो. #जवान.”
त्याचे हे उत्तर ऐकून आपण मार्केटमध्ये गेल्यावर दुकानदार जे उत्तर ग्राहकाला देतो तसेच उत्तर शाहरुखने दिले आहे.