फ्रायडे रिलीज मध्ये पुन्हा एकदा घेऊन आलो आहे तुमच्यासाठी….फिल्म्सची मेजवानी.
तर येत्या शुक्रवारी म्हणजे 18 नोव्हेंबरला दृश्यम २, मिस्टर मम्मी या हिंदी फिल्म आणि सनी ही मराठी फिल्म रिलीज होणार आहे.
तर पाहूया या आठवड्यात तुम्ही कोणता सिनेमा बघायला पाहिजे.
फ्रायडे रिलीज मधील पहिला चित्रपट आहे – दृष्यम २
२०१५ मध्ये रिलीज झालेला दृश्यम हा अॅक्शन थ्रील्लरचा सिक्वेल आहे. दृश्यम 2 मूळ कलाकारांसह पुन्हा आपल्या भेटीला येत आहे. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून पुढे जाऊन ही कथा उलगडणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. या तपासात नवीन कलाकार म्हणजेच अक्षय खन्ना या प्रकरणाच्या तपासात पोलिस अधिकाऱ्यांच्या टीममध्ये सामील झाला आहे. चौथी नापास विजय साळगावकर म्हणजेच अजय देवगण आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी काय-काय करणार हे पाहणे रोमांचक असणार आहे.
फ्रायडे रिलीज मधला दुसरा चित्रपट आहे – मिस्टर मम्मी
जेनिलिया आणि रितेश यांचा मिस्टर मम्मी हा चित्रपट 11 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार होता, परंतु तो काही कारणास्तव पुन्हा एकदा पुढे ढकलला गेला. शाद अली यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच यांनी याआधीही राव बंटी और बबली,ण, साथिया यांसारखे सुपरहिट सिनेमे चित्रपटसृष्टीला दिले आहे. तर भूषण कुमारची टी-सीरीज, कृष्ण कुमार, अली आणि शिव अनंत यांनी हा सिनेमा प्रोड्यूस केला आहे.
फ्रायडे रिलीज मधील तिसरा चित्रपट आहे – सनी
सनी हा मराठी चित्रपट येत्या शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही कथा घरापासून दूर परदेशात राहणाऱ्या सनी बद्दल असून, लांब गेल्यावरच जवळच सापडतं याचं सुंदररित्या विश्लेषण या चित्रपटात केले आहे. त्यामुळे प्रेक्षकही प्रचंड उत्सुक आहे.