२००९ मध्ये आलेला आमीर खान, शर्मन जोशी, आणि आर माधवन यांचा ‘३ इडियटस’ हा सिनेमा आजही सगळ्यांच्या लक्षात आहे. हा सिनेमा प्रत्येकाने ३ ते ४ वेळा किवा त्याहूनही अधिकवेळा तर नक्कीच पहिला असेल. या चित्रपटाची क्रेझ आजही तितकीच आहे. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. यातील ‘व्हायरस’, ‘चतुर’, ‘रँचो’, फुन्सुक वांगडू, असे अनेक पात्र गाजले. सिनेमाने हसतखेळत शिक्षणव्यस्थेवर बोट ठेवलं.
काही दिवसांपूर्वी राजकुमार हिरानी यांनी ‘३ इडियटस’ या सिनेमाचा सिक्वल येणार असल्याची घोषणा केली होती. सिक्वलच्या लिखाणावर काम देखील सुरु असल्याच त्यांनी सांगितल होत. मात्र पुढे याबाबत काहीच समोर आले नाही. आता पुन्हा या चर्चना उधान आले आहे. ते म्हणजे करीना कपूर ने केलेल्या व्हिडीओ मुळे.
View this post on Instagram
करीनाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंट वरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती आमीर खान, शर्मन जोशी, आणि आर माधवन यांची तक्रार करताना दिसून येत आहे. व्हिडिओ शेअर करत ती म्हणाली, ‘मी सुट्टीवर असताना या तिघांचं (आमिर, शर्मन आणि माधवन) चं काहीतरी सुरु होतं. ती प्रेस कॉन्फरन्स… हे तिघंही काहीतरी सिक्रेट ठेवत आहेत. आणि हे शर्मनच्या सिनेमाचं प्रमोशन आहे असं तर अजिबातच सांगू नका. मला वाटतं ते सिक्वलचा विचार करत आहेत. मला सोडून? बोमनलाही याबद्दल माहित नाही वाटतं. त्याला फोन करते. नक्की चाललंय काय यार हे नक्कीच सिक्वलबद्दल असणार आहे.’करीनाच्या या व्हिडीओ नंतर आता बोमन इरानीनीं देखील एक व्हिडीओ शेअर केला आहे. “virus शिवाय ३ इ़डियट्सचा सिक्वल कसा बनेल? नक्की चाललंय काय” असं ते व्हिडिओत म्हणत आहेत.
हे व्हिडिओ पाहून आता चाहतेही संभ्रमात पडले आहेत. खरंच 3 इडियट्सचा सिक्वल येणार आहे का की हा फक्त एक प्रँक आहे हे लवकरच स्पष्ट होईल. राजकुमार हिरानी यांच्या ‘३ इडियट्स’ सिनेमाने ५५ कोटींच्या बजेटमध्ये तब्बल ४०० कोटींची कमाई केली होती. या सिक्वलची चाहते देखील आतुरतेने वाट पाहत आहेत.