अनुष्का शर्मा आणि विराट कोहली (Anushka Sharma And Virat Kohli ) हे कपल त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसे अपडेट शेअर करताना दिसत नाहीत. त्यांच्या नात्याबद्दल मीडियामध्ये कमीत कमी चर्चा व्हावी, असा त्यांचा प्रयत्न असतो. मात्र पापाराझींच्या कॅमेऱ्यामध्ये अनेकदा ही जोडी स्पॉट होतेच. ते जरी माध्यमांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असले, तरी चाहत्यांना त्यांच्याविषयी जाणून घेण्यात कमालीची उत्सुकता असते. दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून विरुष्का च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रेक्षकांची ही आवडती जोडी दुसऱ्यांदा आई-बाबा होणार असल्याचे समोर आले आहे. अनुष्काच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीच्या बातम्या व्हायरल होत असून या जोडप्याने अद्याप या चर्चांना ना दुजोरा दिलाय, ना त्यांनी त्या नाकारल्या आहेत.
विरुष्काच्या पहिल्या मुलीचा जन्म जानेवारी २०२१ मध्ये झाला. विरुष्का च्या पहिल्या मुलीचे नाव वामिका असून अद्याप त्यांनी वामिकाचा चेहरा सर्वांपासून लपवून ठेवला आहे. या दरम्यानच विरुष्का पुन्हा एकदा पालक होणार असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी अनुष्काला एका मॅटर्निटी क्लिनिकबाहेर पाहिलं गेलं होतं. तेव्हापासून तिच्या प्रेग्नंसीच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र यावर अद्याप अनुष्का किंवा विराट कोहलीने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.
View this post on Instagram
अशातच आता अनुष्कानं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यामध्ये ती प्रेग्नंसी टेस्ट किटची जाहिरात करताना दिसून येत आहे. अनुष्कानं ही पोस्ट शेअर करताच अनेक नेटकऱ्यांनी तिला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. तसेच कमेंट बॉक्समध्ये अनेकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. आम्ही तुझा इशारा समजतोय’, असं एकाने लिहिलं. तर ‘याचा अर्थ तू दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहेस’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘छोटा विराट येतोय’, अशाही शब्दांत चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. ‘अनुष्का शर्मा प्रेग्नंट आहे, कन्फर्म’, असंही काहींनी लिहिलं आहे.
काही महिन्यांपूर्वी अनुष्का आणि विराट हे बंगळुरमधील हॉटेलमध्ये स्पॉट झाले. या हॉटेलमधील विराट आणि अनुष्का यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.या व्हिडीओमध्ये अनुष्का ट्रेडिशनल आऊफिटमध्ये दिसली. यावेळी अनुष्का बेबी बंप लपवण्याचा प्रयत्न करत होती, अशा कमेंट नेटकऱ्यांनी विरुष्काच्या व्हायरल व्हिडीओला केल्या. तसेच त्यांच्या दुसऱ्या बाळासाठी चाहतेही उत्सुक आहेत. आता अनुष्का खरोखर प्रेग्नंट आहे का, हे त्यांनी घोषणा केल्यानंतरच स्पष्ट होईल.