View this post on Instagram
अनुष्का व विराट सध्या विश्वचषकाच्या सामन्यासाठी बेंगळूरमध्ये आहेत. अशातच आता विरुष्का बेंगळुरू येथे स्पॉट झाले आहेत. अनुष्का आणि विराट दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहेत अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर होत आहे. त्याच दरम्यान त्या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमुळे अनुष्काच्या प्रेग्नेंसीच्या चर्चाना उधाण आले आहे. त्या व्हिडीओमध्ये ती बेबी बंप लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.
ह्या व्हिडीओमध्ये अनुष्काने बलून सलिव्हसह काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. अनुष्का आणि विराटच्या व्हायरल व्हिडीओवर अनेकांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, “अनुष्का प्रेग्नंट आहे?” तर दुसऱ्या युझरने कमेंट केली, “ज्युनिअर विराट येणार आहे, अनुष्का प्रेग्नंट आहे.”
सध्या विराट आणि अनुष्का यांच्या चाहत्यांमध्ये फक्त आणि फक्त नव्या पाहुण्याची चर्चा रंगली आहे. पण यावर दोघांनी अधिकृत कोणतेही घोषणा केलेली नाही. ते दोघे जरी त्याच्या खासगी आयुष्याबद्दल सोशल मीडियावर जास्त काही शेअर करत नसले तरी सुद्धा त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या बद्दल जाणून घेण्याची कमालीची उत्सुकता आहे. विरुष्का यांच्या दुसऱ्या बाळासाठी त्यांचे चाहते देखील उत्सुक आहेत. आता अनुष्का खरोखर प्रेग्नंट आहे का, हे त्यांनी घोषणा केल्यानंतरच स्पष्ट होईल.
सध्या वर्ल्डकपमुळे सर्वाधिक चर्चेत असलेला खेळाडू म्हणजे ‘विराट कोहली.’ तर विराटसह आपसूक जोडले बॉलिवूडविश्वातील नाव म्हणजे सिनेसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री ‘अनुष्का शर्मा.’ अनुष्का आणि विराट त्यांच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असतात.
क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे सर्वांचे आवडते कपल आहे. त्या दोघांचा चाहता वर्ग देखील प्रचंड मोठा आहे. अनुष्का सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ती सोशल मिडियाच्या माध्यमातून तिच्या आयुष्यातील अनेक महत्वाच्या गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतात.
२०१७ मध्ये अनुष्काने विराटसोबत लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. जानेवारी २०२१ मध्ये अनुष्काने मुलीला जन्म दिला. तिचे नाव ‘वामिका’ असे ठेवण्यात आले. विराट आणि अनुष्का कायम एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. तर आता त्या दोघांची चांगलीच चर्चा रंगली आहे. अनुष्का आणि विराट हे दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहेत असे म्हटले जात आहे. पण याबाबत विराट आणि अनुष्काने आजून कोणतीही माहिती दिलेली नाही.