छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘रंग माझा वेगळा’ आत्ता ऑफ एअर गेली असली तरी, यातील कलाकारांची सोशल मीडियावर जोरदार हवा पाहायला मिळत आहे. या मालिकेतील सगळेच कलाकार सोशल मीडियावर सक्रिय आहे. या मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री आता लवकरच एका नव्या चित्रपटात झळकणार असल्याची बातमी समोर आली आहे.
चर्चेचा विषय म्हणजेच या अभिनेत्रीने अभिनय करता करता व्यावसायिक क्षेत्रात देखील प्रवेश केला आहे. आत्ता ही अभिनेत्री कोण हे तुम्ही ओळखलच असणार… होय ही अभिनेत्री म्हणजेच अनघा अतुल. (Angha Atul) काही महिन्यांपूर्वीच अनघाने व्यावसायिक क्षेत्रात पाऊल टाकले असून तिने पुण्यामध्ये स्वतःच पारंपारिक हॉटेल सुरू केल आहे. ‘वदनी कवळ’ असं या हॉटेलचं नावं असून ती नेहमी सोशल मीडियावर याचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. यंदा गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर अनघाने नवीन हॉटेल सुरू करणार असल्याची माहिती तिच्या चाहत्यांना दिली होती. अनेक कलाकार मंडळींनी तिच्या या हॉटेलमध्ये जेवणाचा आस्वाद घेतला आहे. सध्या तिच्या हॉटेलची मराठी सिनेसृष्टीत चांगलीच चर्चा सुरू आहे.
भगरे गुरुजी यांची कन्या व रंग माझा वेगळा मधील श्वेता अर्थात अनघा अतुल लवकरच चित्रपटात झळकणार आहे. अनघा अतुल हिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून स्टोरी शेअर करत चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. ज्यामध्ये चित्रपटाची स्क्रिप्ट आणि लोकेशन दिसत आहे. तसेच या फोटोवर अनघाने लिहिलं आहे, “मुव्ही टाइम…लवकरच…गणपती बाप्पा मोरया.” पण अनघाने अद्याप ती कोणत्या चित्रपटात झळकणार, याची माहिती दिली नाहीये.
अनघाला लहानपणापासून अभिनयाची आवड होती. कॉलेजमध्ये असताना छोट्या मोठ्या एकांकिकामध्ये ती सहभागी व्हायची. परंतू या क्षेत्रात येण्यापूर्वी तिनं पडद्यामागेही महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या आहेत. अनघाने महेश कोठारे यांच्या ‘कोठारे व्हिजन’ मध्ये ब्रँड मॅनेजर म्हणून काम पाहिलं होतं. तसंच ‘अनन्या’ या नाटकामध्ये तिनं अनन्याची मैत्रीण प्रियांका ही व्यक्तिरेखा देखील साकारली होती.