बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या हॉलिवूड मधील देखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने तिच्या अभिनयाने अनेकांच्या मनावर राज्य केलं आहे, तिचे चाहते देखील मोठ्या प्रमाणात आहे. ती नेहमीच सामाजिक विषयांवर बोलताना दिसत असते.
काही दिवसांपूर्वी प्रियांकाने संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित केले. प्रियांकाने या परिषदेत जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. या क्षणी चे काही फोटो आणि व्हिडिओ तिने तिच्या सोशल मीडिया वरून शेअर केले आहेत. ‘हल्ली जगात सर्व काही ठीक चाललेलं नाही’, असे प्रियांकाने म्हटले आहे. यामुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे.
प्रियांकाने न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्र महासभेतील काही फोटो शेअर केले आहेत. यात तिने UNGA मधील शाश्वत विकास उद्दिष्टे (SDG) क्षणाचे अनेक व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहे. या फोटो मध्ये प्रियांका वेनेसा नकाते, मलाला युसुफ, अमांडा गोरमन, सोमाया फारुकी आणि ज्युडिथ हिल यांच्या सोबत दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर तिच्या भाषणाचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताना दिसून येत आहे. ती म्हणाली की, “आज आपण सर्वजण एका महत्वपूर्ण टप्प्यावर भेटलो आहोत, जिथे जागतिक एकता हि खूप महत्वाची आहे. सध्या जग हवामानातील बदल आणि कोव्हिड१९ या साथीच्या रोगाचा सामना करत आहोत. आधीच जगाला द्वेष, उपासमार, संघर्ष, गरीबी आणि असमानता यासारख्या अनेक चिंता सतावत आहेत, त्यामुळे जगात सर्व काही ठीक नाही. पण ही संकटे अचानक आली नाहीत आणि योग्य योजना आखून या संकटावर आपण मात करू शकतो, या योजना युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स यांच्याकडे आहेत.”
View this post on Instagram
पुढे ती असंही म्हणाली की,”मी भारतात लहानाची मोठी झाली आहे. भारतात अजूनही इतर भागांप्रमाणे मुलींना शिक्षणाचा हक्क नाही, तो हक्क मिळवणे हे देखील त्यांना आव्हान वाटते आहे. एकीकडे मुलींना शिकायचे आहे, तशी त्यांच्यात प्रबळ इच्छा आहे. तर दुसरीकडे त्यांच्या समोर अनेक आव्हाने आहेत. पण माझा विश्वास आहे की शिक्षण म्हणजे समता, सामाजिक न्याय, सामाजिक परिवर्तन आणि लोकशाहीचा आधार आहे. त्यामुळे ही समस्या लवकर दूर होईल अशी माझी आशा आहे.” प्रियांकाने या परिषदेत जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. यावेळी तिने फक्त कोव्हिड आणि शिक्षण नव्हे तर अनेक विषयांवर तिचे मत मांडले आहे. तिचे हे वक्तव्य सध्या खूप चर्चेत आहे, सध्या सर्वत्र तिचे खूप कौतुक होत आहे.