अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर म्हणजेच सगळ्यांचे लाडके राणादा आणि पाठकबाई हे दोघे लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. या दोघांचा मे महिन्यात साखरपुडा पार पडला, दोघांनी आपल्या कुटुंबासोबत व जवळच्या मित्रमंडळीसोबत अगदी थाटामाटात साखरपुडा केला.
सध्या दोघांच्याही घरी लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे, दोघेही शुटींग मधून वेळ काढून लग्नाची तयारी करत आहेत. काही दिवसांपूर्वी हार्दिकचे केळवण पार पडले. त्याचे काही खास फोटो त्याने सोशल मिडियावरून शेअर केले, तर अक्षयाने देखील तिच्या मैत्रिणींसोबत बॅचेलर पार्टीचे फोटो शेअर केले.
View this post on Instagram
सध्या दोघेही लग्नाच्या खरेदीमध्ये व्यस्त आहेत. नुकतीच अक्षया लग्नात नेसणाऱ्या साडीच्या विनकामाला सुरवात झाली. काल अक्षया, हार्दिक, त्यांचे काही मित्रमंडळी आणि कुटुंबीयांनी साडीचा पहिला धागा विणला. यावेळी हार्दिकने खास अक्षयासाठी पैठणी विणली.
हार्दिक सोबतच त्यांच्या मित्रमंडळींनी देखील हातमागावर साडी विणण्याचा अनुभव घेतला. अभिनेत्री वीणा जगताप, ऋचा आपटे आणि अमोल नाईक यांनी सुद्धा साडीचा धागा विणला. पहिल्यांदाच हातमागावर धागा विणण्याचा अनुभव घेत असल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्याचे काही खास क्षण सोशल मिडियावर शेअर केले आहेत. आता सगळ्यांनाच या लग्नाची उत्सुकता लागली आहे, हे दोघे आता नक्की कधी लग्नगाठ बांधणार आहेत या कडे सगळ्यांचे लक्ष आहे.