बिग बॉस हा असा शो आहे जो घराघरात पाहिला जातो. टेलिव्हिजन विश्वातील अतिशय वादग्रस्त शो अशी या शोची ओळख आहे, तरीही प्रेक्षक तितक्याच पसंतीने पाहतात. बिग बॉस मराठीचं पर्व ४ सुरु झालयं, या पर्वाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. या पर्वाचं पहिलं नॉमिनेशन पार पडले. कोणता सदस्य घराचा निरोप घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर डॉ. निखील राजेशिर्के हा स्पर्धक घराबाहेर पडला, त्यामुळे त्याचे चाहते प्रचंड नाराज आहेत.
बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच निखीलने घरात पुन्हा प्रवेश घेणार असल्याचा खुलासा केला आहे. तसेच महेश मांजरेकरांनी निखिलचे कौतुक देखील केले, “बाकी काहीही असू दे, घरातला हा बेस्ट माणूस होता”. अनेकांनी त्याला वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून पुन्हा घरात संधी मिळावी अशी इच्छा व्यक्त केली.
निखिलनेही घरात पुन्हा जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे, “मी जर पुन्हा बिग बॉसच्या घरात गेलो तर मला वोट करायला अजिबात विसरु नका कारण माझा गेम अजूनही ऑन आहे. मी आता जरी बिग बॉसमधून बाहेर पडलो असलो तरी मी तसे समजत नाही. कारण मी अजूनही या स्पर्धेत आहे. येत्या जानेवारीपर्यंत बिग बॉस सुरु राहणार आहे. तोपर्यंत मी तुम्हाला पुन्हा बिग बॉसच्या घरात दिसून सरप्राईज नक्कीच करु शकतो”.
View this post on Instagram
पुढे निखिल असं देखील म्हणाला, “ वाईल्ड कार्ड म्हणून इंट्री घ्यायला मला नक्कीच आवडेल. जर मी वाईल्ड कार्ड म्हणून इंट्री घेतली तर मी असा पहिला स्पर्धक असेल जो वाईल्ड कार्ड एंट्री घेऊन हा शो जिंकेल. तिथे जो मनापासून खेळतो तोच बाहेर पडतो, अशा अनेक कमेंट्स मलाही आल्या आहेत. मी खूप चांगलं खेळलो. बिग बॉसमध्ये फक्त भांडणं, गॉसिप करणारे लोक नाही तर खरी माणसंही खेळू शकतात आणि जिंकू शकतात. आज जरी मी बाहेर पडलो असेल तरी तिथे जेव्हा खरंच खऱ्या माणसाची गरज आहे, असे बिग बॉसला वाटेल तेव्हा ते मला परत बोलवतील आणि मी नक्की पुन्हा घरात जाईन. त्यावेळी मी माझा गेम खरेपणाने खेळेन आणि त्या ठिकाणी असणाऱ्या खोट्या माणसांना तिथून काढण्याची स्ट्रॅटेजी नक्की वापरेन”.
आता खरोखर निखील पुन्हा घरात प्रवेश करणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. पहिल्या दिवसापासून घरात होणारे वाद, भांडण आणि राडे यामुळे हे पर्व चांगलेच गाजत आहे. यंदाचं हे पर्व ऑल इज वेल या थीमवर सुरु आहे. आता पुढे घरात आणखी काय काय होणार, आणखी किती राडे होणार हे पाहायला प्रेक्षक देखील उत्सुक आहेत.