नुकतंच बिग बॉस मराठीचं चौथ पर्व सुरु झालं, अगदी पहिल्या दिवसापासून स्पर्धकांमधील वाद, राडे समोर येत आहेत. पहिल्याच आठवड्यात महेश मांजरेकर यांनी स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली. बिग बॉसच्या घरातील भांडणं आणि राग अगदी वरच्या थराला जातात हे प्रेक्षकांसाठी काही नवीन नाही, या आठवड्यात देखील घरात अशिच काहीशी परिस्थिती निर्माण झाली.
या परिस्थितीवर बिग बॉस ३ च्या पर्वातील सदस्य आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री सुरेखा कुडची हिने भाष्य केलं. तिने तिच्या सोशल मिडियावरून एक पोस्ट केली आहे, त्यात घरातील ज्येष्ठ कलाकारांना मान मिळत नसल्याची खंत व्यक्त केली आहे.
View this post on Instagram
सुरेखा बिग बॉस ३ च्या पर्वात सदस्य होत्या, त्या आताचा सीजन देखील तितक्याच पसंतीने पाहतात. त्यांना स्पर्धकांच वागण काही पटलेलं दिसत नाही “आज बिग बॉस मराठीचा एपिसोड पाहिला. नवोदित कलाकार एखाद्या ज्येष्ठ कलाकाराला अरे तुरे करून बोलतो हे ऐकून वाईट वाटलं. निदान वयाचा तरी मान ठेवून बोलावं.” असं सुरेखा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे म्हटलं आहे. त्यांनी हे अपूर्वा नेमळेकर हिला सुनावल्याच दिसून येत आहे. मेघा घाडगे व विकास सावंत यांच्यात वाद झाला होता, याच वादात किरण माने आणि अपूर्वा नेमळेकर यांनी उडी घेतली. हा वाद इतका वाढला की, अपूर्वाने किरण यांना अरे तुरेची भाषा केली, “अरे ए किरण माने तो त्याचं बोलेल ना तुला काय करायचं आहे?” यावरून सुरेखा यांनी राग व्यक्त केला आहे, तसेच त्यांच्या पोस्टला कमेंट्स करत चाहत्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.