बॉलीवूडमधील लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर. आलिया आणि रणबीर एकमेकांना ५ वर्ष डेट करत होते. एप्रिल महिन्यात दोघे लग्न बंधनात अडकले. लग्नानंतर काही महिन्यातच दोघांनी गोड बातमी दिली, ती म्हणजे आलिया लवकरच आई होणार आहे. नुकतेच आलियाचे डोहाळे जेवण पार पडले, या कार्यक्रमाला सगळ्यांनीच हजेरी लावली होती.
नुकताच आलिया आणि रणबीरचा ब्रम्हास्त्र हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. सिनेमाच्या प्रमोशनवेळी अनेकदा आलिया बेबी बंप फ्लॉन्ट करतानाही दिसून आली. तिचे फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाले.
आलियाने पहिल्यांदाच मॅटर्निटी फोटोशूट केले आहे. याचे फोटो तिने तिच्या सोशल मिडिया वरून शेअर केले. प्रेग्नन्सीनंतर आलियाने ‘Eda Mama’ नावाचा मॅटर्निटी क्लोथ ब्रॅण्ड सुरू केला आहे. तिच्या या ब्रॅण्डसाठी तिने हे फोटोशूट केलं आहे.
प्रेग्नन्सी दरम्यान आलियाचा चेहरा चांगलाच खुलून आला आहे. तिच्या चेहऱ्यावर तसा ग्लो दिसूनही येतोय.
काळा रंगाच्या ड्रेस मध्ये आलिया बेबी बम फ्लॉन्ट करताना खुलून दिसत आहे.
डेनिम जम्पसुट मध्ये आलिया पाऊट करताना खूपच सुंदर दिसत आहे.
आता आलियाला मुलगा होणार की मुलगी याकडे सगळ्यांचेच लक्ष आहे.