आज पर्यंत अनेक बॉलीवूड अभिनेत्यांनी ऐतिहासिक भूमिका साकारल्या आहेत, आता या लिस्ट मध्ये आणखी एका अभिनेत्याची भर पडणार आहे. विकी कौशलने आतापर्यंत त्याच्या उत्तम अभिनयाने सगळ्यांची मन जिंकून घेतली, त्याने बॉलीवूडमध्ये त्याचं वेगळ स्थान निर्माण केल आहे. विकी कौशल आता लवकरच एका ऐतिहासिक भूमिकेत दिसणार आहे. विकी छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मिडिया रिपोर्ट नुसार तख्त आणि इमोर्टल अश्वत्थामा या चित्रपटांनंतर विकीने आणखी एका ऐतिहासिक चित्रपटाची ऑफर स्वीकारली आहे. विकी कौशल त्याच्या आगामी चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा लवकरच मोठ्या पडद्यावर येणार आहे. लक्ष्मण उत्तेकर हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटात विकी कौशल मुख्य भूमिका साकारणार असल्याची माहिती आहे. परंतु, याबाबत विकी कौशलने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
लक्ष्मण उत्तेकर यांनी आतापर्यंत ‘मिमी’, ’लुका छुपी’ या चित्रपटांच दिग्दर्शन केल आहे, ते विकी बरोबर आणखी एक विनोदी चित्रपट दिग्दर्शित करत आहेत. या ऐतिहासिक चित्रपटाचं लेखन पूर्ण झालं असून चित्रपटाचं नाव अद्यापही गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.
विकी सध्या त्याच्या आगामी ‘सॅम बहाद्दर’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तो लष्करी अधिकारी ‘सॅम बहाद्दर’ यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. विकीला या ऐतिहासिक भूमिकेत पाहण्यासाठी आता चाहते देखील उत्सुक आहेत.