‘हिंदी बिग बॉस १६ ’हा आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे, या शोचा ग्रँड फिनाले अवघ्या सात दिवसांवर आहे. प्रेक्षकांनी देखील या सिझनला भरभरून प्रेम दिले. या घरात एकूण १६ सदस्यांनी प्रवेश केला होता. त्यातील आता फक्त ७ सदस्य उरले आहेत. सदस्यांमध्ये ट्रॉफी जिंकण्यासाठी अटीतटीचा सामना सुरु आहे. घरातील ७ पैकी ४ सदस्यांनी आपली जागा फिनाले वीक मध्ये निश्चित केली आहे. मात्र ३ सदस्य अजूनही एलीमिनेट होण्याच्या मार्गावर आहेत.
मागील आठवड्यापासून सलमानच्या जागी या शोचे सूत्रसंचालन करण जोहर करत आहे. हिंदी बिग बॉसमध्ये मराठमोळा शिव ठाकरे धुमाकूळ घालताना दिसतोय. पण आता त्याच्या चाहत्यांना चिंतेत टाकणारी बातमी समोर येत आहे. ‘बिग बॉस’च्या या शेवटच्या आठवड्यामध्ये घरातील एका सदस्याला घराबाहेर जावं लागणार आहे. शिव ठाकरे, एमसी स्टँड आणि सुंबुल मधून एक स्पर्धक बाहेर जाणार आहे. सुंबुलच या आठवड्यात घराबाहेर जाईल असं अनेकांना वाटत आहे. ‘बिग बॉस 16’ च्या आजच्या एपिसोडमध्ये करण जोहर सुंबुल तौकीर खान, शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन यांच्या बॉन्डिंगबद्दल टीमशी बोलणार असल्याचे दिसून येत आहे.
टीम मंडळी कोणत्या तरी एका सदस्यामुळे तुटणार अस भाष्य करण जोहरने केल आहे.. यावर निम्रीतने टीम मंडळी कधीच विभक्त होणार नाहीअसे उत्तर दिले आहे. मात्र घरातील एका सदस्याला बाहेर जावं लागेल असं करण ठामपणे सांगतो. यावेळी करण शिवकडे बघून म्हणतो तुला कमी वोट आहेत म्हणून तुला घराबाहेर जावं लागणार आहे. व्हिडीओमध्ये शिव घरातून बाहेर जात असल्याच दिसत आहे. परंतु हा व्हिडीओ पाहून प्रेक्षक मात्र प्रचंड नाराज झाले आहेत. शिव घराबाहेर जाऊच शकत नाही, शिव घराबाहेर पडला तर शो बघणंच बंद करणार, या शोचा विजेता घराबाहेर कसा पडू शकतो अशा अनेक कमेंट हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी केल्या आहेत.