मिस युनिवर्स आणि अभिनेत्री सुश्मिता सेन हिने वयाची ४५ शी ओलांडली आहे. परंतु आजही ती तितकीच तरुण आणि सुंदर आहे. तीने सौंदर्य आणि फिटनेसच्या बाबतीत आजकालच्या अभिनेत्रींना देखील मागे टाकले आहे. ती कधीच आपल्या फिटनेसकडे दुर्लक्ष करत नाही. सुश्मिता नेहमीच तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत असते, ती मागील काही वर्षात सुश्मिता सेन तिच्यापेक्षा १५ वर्ष वयाने लहान असणाऱ्या मुलाला डेट करत होती. पण काही काळानंतर दोघेही विभक्त झाले.
View this post on Instagram
ती सोशल मिडियावर देखील नेहमीच सक्रीय असते. या वेळी तिने तिच्या सोशल मिडिया अकाऊंट वरून एक पोस्ट शेअर केली आहे. ह्या पोस्टद्वारे सगळ्यांना धक्का बसला. यामध्ये तिने तिच्या आरोग्याबाबत माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी सुश्मिताला हृदयविकाराचा झटका येऊन गेला. इतकंच नव्हे तर तिला होणारा त्रास पाहता सुश्मिताची अँजिओप्लास्टीही करण्यात आली. वडिलांबरोबरचा हसरा फोटो शेअर करत तिने ही माहिती दिली. सुश्मिताला हृदयविकाराचा झटका आला हे ऐकूनच चाहते चिंतेत पडले आहेत.
सुश्मिता म्हणाली, “तुझं हृदय मजबूत व आनंदी ठेव… वाईट काळात जेव्हा तुला त्याची सर्वाधिक गरज असेल, तेव्हा तेच तुला सोबत करेल…, या महान ओळी माझ्या वडिलांच्या आहेत. काही दिवसांपूर्वी मला हृदयविकाराचा झटका आला. अँजिओप्लास्टीही झाली. आता ठिक आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या हृदयरोग तज्ज्ञांनी माझं हृदय मोठं आहे याची मला खात्री पटवून दिली. यादरम्यान बऱ्याच लोकांनी मला मदत केली. या लोकांसाठी मी दुसरी पोस्ट शेअर करेन”. “ही पोस्ट फक्त माझ्या शुभचिंतक व जवळच्या व्यक्तींसाठी आहे. आता मी अगदी मस्त आहे ही आनंदाची बातमी मला तुम्हाला द्यायची होती. मी नवीन आयुष्यासाठी आता तयार आहे”. सुश्मिताच्या या पोस्टनंतर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. तिच्या या पोस्टवर चित्रपटसृष्टी तसेच तिचे अनेक चाहते देखील कमेंट करत आहेत. तू लवकर यामधून बरी हो, तुझी काळजी घे असं कमेंट करत म्हणत आहेत.