Bollywood चा King Shahrukh Khan सध्या त्याच्या ‘Pathaan‘ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत होता. Pathaan ने जगभरात बरीच कमाई केली. त्यामुळे तो मागील काही दिवसांपासून बराच खुश होता. परंतू आज त्याच्या आनंदात मिठाचा खडा पडला आहे. त्याचे कारण म्हणजे Shahrukh Khan ची पत्नी Gauri Khan विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. Gauri Khan सह आणखी तीन व्यक्तींवरोधात Uttar Pradesh मधील Lucknow मध्ये FIR दाखल करण्यात आली आहे.
Mumbai तील एक व्यक्ती Jaswant Shah यांनी ‘Tulsiani Constructions and Developers Limited’ Lucknow मध्ये फ्लॅट खरेदी केला होता. त्याची किंमत कोट्यवधीत होती. त्यापैकी आतापर्यंत ८६ लाख रुपये त्यांनी दिले आहेत. तरीही त्याला फ्लॅट मिळाला नाही, असा दावा Jaswant Shah यांनी केला आहे.
एवढेच नाही तर Jaswant Shah यांनी Tulsiani Constructions and Developers Limited चे CMD Anil Kumar Tulsiani आणि संचालक Mahesh Tulsiani यांच्या विरोधातही FIR दाखल केली आहे. तिघांवरही कलम ४०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशांत गोल्फ सिटी पोलीस ठाण्यातून तशी माहिती देण्यात आली आहे. Gauri Khan ही या ब्रँडची अॅम्बेसेडर आहे तिच्याकडून झालेला प्रचार प्रसार पाहून प्रभावित होऊन हा फ्लॅट खरेदी करण्यात आला. पण माझी फसवणूक झाली असे Jaswant Shah यांनी सांगितले आहे.
परंतू या झालेल्या प्रकरणावर Gauri Khan ने अजूनही काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. तेथील पोलीस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत. कंपनीची ब्रँड अॅम्बेसेडर असल्याने Gauri चं देखील नाव या प्रकरणात आले आहे. त्यामुळे आता पोलीस या प्रकरणात काय कारवाई करणार आणि हे प्रकरण कोणतं वळण घेणार याकडेच सर्वांचे लक्ष आहे.