छोट्या पडद्यावरील राधा म्हणजेच अभिनेत्री वीणा जगताप. वीणा जगताप ही राधा म्हणून घराघरात तर पोहचलीच, पण ‘बिग बॉस मराठी २’ मुळे तिच्या चाहत्यांमध्ये आणखीनच भर पडली. बिग बॉस च्या घरात तीच आणि शिव ठाकरेचं अफेर देखील चांगलच गाजलं होतं. पण घरातून बाहेर आल्यानंतर काही दिवसातच ते दोघे वेगळे झाले.
वीणा जगताप ही सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. नुकतंच वीणाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टद्वारे तिने तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. वीणाने नुकतंच एक नवीकोरी गाडी खरेदी केली आहे. तिने तिच्या गाडीबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे. “आमच्या कुटुंबात एका नव्या सदस्याचे स्वागत.
माझी पहिली गाडी… मेड इन इंडिया. व्होकल फॉर लोकल, असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे. वीणाने टाटा मोटर्सची टाटा पंच ही गाडी खरेदी केली आहे. तिने स्वत: हॅशटॅग देत याबद्दल सांगितले आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच वीणाने एक व्हिडीओ शेअर करत गाडीचे प्रशिक्षण घेतल्याचा अनुभव शेअर केला होता. त्यावेळी तिने तिला उत्तम गाडी चालवता येते हे देखील सांगितले होते.
वीणा ही सध्या यशाच्या पायऱ्या चढताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी वीणाने अधिकृत मेकअप आर्टिस्ट म्हणून पदवी संपादन केली. चाहत्यांकडून वीणावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.