आत्तापर्यंत आपण अनेक मालिका पाहिल्या आहेत त्यापैकी एक म्हणजे श्रीयुत गंगाधर टिपरे, २००१ मध्ये आलेली मालिका श्रीयुत गंगाधर टिपरे या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.
कुटुंब कसं असाव हे या मालिकेतून सांगण्यात आलं. श्रीयुत गंगाधर टिपरे या मालिकेच दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलं होतं. मालिकेतील प्रत्येक कलाकारांनी त्यांच्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केल. कुटुंबावर आधारित या मालिकेमध्ये आबा टिपरेंच्या भूमिकेत दिलीप प्रभावळकर, शेखर टिपरेची भूमिका राजन भिसे, श्यामल टिपरेची भूमिका शुभांगी गोखले, शिऱ्याची भूमिका विकास कदम आणि शलाकाची भूमिका रेश्मा नाईक या कलाकारांनी साकारल्या होत्या. ही मालिका दिलीप प्रभावळकर यांच्या पुस्तकावर आधारित होती.
View this post on Instagram
आता लवकरच केदार शिंदे यांचे आजोबा म्हणजेच कृष्णराव गणपत साबळे यांच्या आयुष्यावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. या सिनेमाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. या सिनेमाचा टीझर अलिकडेच प्रदर्शित झाला. अभिनेता अंकुश चौधरीने सिनेमात मुख्य भूमिका साकारली आहे. या सिनेमाच्या निमित्ताने एक कार्यक्रम आयोजित केला होता, या कार्यक्रमाला मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमाचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. त्यापैकी श्रीयुत गंगाधर टिपरे या मालिकेतील कुटुंबियांचा एक फोटो केदार शिंदे यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्या फोटोला ‘जुनं ते सोनं’ अस कॅप्शन दिल आहे. केदार शिंदे यांनी पोस्ट केलेला हा फोटो खूपच खास ठरला मात्र, या फोटो मध्ये शिऱ्याची भूमिका करणारा सर्वांचा लाडका विकास कुठेही दिसत नाही. शिऱ्या कुठे आहे दादा अश्या कमेंट या पोस्टवर आल्या आहेत.
तब्बल १८ वर्षांनी श्रीयुत गंगाधर टिपरे या मालिकेतील कलाकारांना एकत्र आलेले पाहून चाहत्यांना खूपच आनंद झाला.