टीव्हीवरील अतिशय वादग्रस्त पण तितकाच आवडीने पाहिला जाणारा शो म्हणजे ‘बिग बॉस १७’ (Bigg Boss 17) सलमान खान होस्ट करत असलेल्या बिग बॉस हिंदी या रिअलिटी शोला पहिल्या पर्वापासूनच प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. झगमगत्या दुनियेतील चमचमते तारे बिग बॉसच्या घरात एकत्र राहतात. बिग बॉस हिंदीच १७ व पर्व हे ऑक्टोबर महिन्यात सुरू झाल असून या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.
नुकतच या घरात एलिमिनेशन पार पडल. त्यामध्ये अंकिता लोखंडेच्या पतीला म्हणजेच विकी जैनला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्यात आलं आहे. विकीने जेव्हा चिठ्ठी उघडली, तेव्हा त्यावर ‘एव्हिक्टेड’ असं लिहिलेलं होतं. विकीला घराबाहेर काढण्याआधी बिग बॉसने अंकिता आणि विकीला शोमध्ये सहभागी होण्याबद्दल प्रश्न विचारला. “ शोमध्ये भाग घेतल्याबद्दल कसं वाटतंय?”, असा प्रश्न बिग बॉसने विचारला. त्यावर अंकिता म्हणाली की, “माझ्यासाठी हा प्रवास खूप कठीण होता. कारण मी घरात सर्वांशी लढले, पण माझ्या पतीसोबत हरले.” तर विकीने सांगितलं की बिग बॉसमध्ये आल्यानंतर तो अंकितासोबतच्या नात्याला आणखी चांगल्याप्रकारे समजू शकला आहे. बिग बॉसमुळे लग्नाच्या सुरुवातीच्या वर्षांतच एकमेकांच्या चुकांमधून शिकण्याची संधी मिळाली, असं म्हणत त्याने आभार मानले.
तसेच विकीला मिठी मारत अंकिता म्हणाली की, “तू हा खेळ खूप चांगला खेळलास. कोणत्याही पाठबळाशिवाय तू इथे आलास, पण शोमध्ये तू स्वत:च्या जोरावर आपलं स्थान निर्माण केलंस. तुझी पत्नी असल्याचा मला अभिमान आहे. मी विकी जैनची पत्नी अंकिता लोखंडे आहे, असं मी अभिमानाने बोलू शकते”, असं ती म्हणाली. विकीला बाहेर जाताना पाहून अंकिताला अश्रू अनावर झाले. तिला हसवण्यासाठी विकी म्हणतो की, “आता मी बिग बॉसच्या घराबाहेर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत पार्टी करणार आहे.”
तसेच बिग बॉसच्या ग्रँड फिनालेला जाणार्या ‘टॉप ५’ स्पर्धकांची निवड करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. यावेळी अभिषेक कुमार हा पहिला फायनलिस्ट बनला. तर, त्याच्यानंतर मन्नारा चोप्रा आणि मुनव्वर फारुकी यांना अंतिम फेरीसाठी निवडण्यात आले. तसेच नंतर, ‘बिग बॉस’ने विकी जैन, अरुण महाशेट्टी, अंकिता लोखंडे या तीन स्पर्धकांमधून विकी जैन याला बाहेर पडण्याचा आदेश देत, अरुण आणि अंकिता यांना अंतिम फेरीतील स्पर्धक म्हणून घोषित केले.
View this post on Instagram
या शो चा ग्रँड फिनाले २८ जानेवारीला संध्याकाळी ६ वाजता पार पडणार असून विजेत्याला सुमारे ३० ते ४० लाखांचा चेक व सोबतच एक आलिशान कार मिळणार असल्याच बोलल जात आहे.